विराट कोहली (Virat Kohli) याने जेव्हापासून भारतीय संघांच्या कर्णधारपदांचा त्याग केला आहे तेव्हापासून संघाला एक नियमित कर्णधार मिळत नाहीये. विराटनंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याला भारतीय संघाच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठीचे नेतृत्वपद सोपवण्यात आले. तो इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात कोरोनामुळे अनुपस्थित होता यामुळे जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला भारताचा कर्णधारपद सोपवण्यात आले. आता इंग्लंड विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पुन्हा एकदा रोहित कर्णधारपदावर नियुक्त झाला आहे.
रोहितच्या व्यतिरिक्त शिखर धवन (Shikhar Dhawan), रिषभ पंत (Rishabha Pant), हार्दिक पंड्या यांना बीसीसीआयने कर्णधार म्हणून निवडले. मागील ७ महिन्यांपासून ७ कर्णधार बदलल्याने बीसीसीआय चांगलीच ट्रोल झाली आहे. कर्णधार बदलल्यामागचे कारण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले, “७ महिन्यांत ७ कर्णधार हा बदल करणे चुकीचे आहे, मात्र काही कारणास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. परिस्थितीच अशी आली आहे की आम्हाला कोणता कर्णधार योग्य याची निवड करण्यासाठी निरिक्षण करावे लागत आहे.”
“भारतीय संघाचे वेळापत्रक व्यस्त असल्याने काही खेळाडूंना आराम देणे आवश्यक असते. त्यातच एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला तर अडचणींमध्ये वाढ होऊन संघ व्यवस्थापकांनाच त्यावर उपाय काढावा लागतो. एखादा खेळाडू अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळत असेल तर तो अधिक तंदुरूस्त राहतो,” असेही गांगुली यांनी म्हटले आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) पहिला टी२० सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. या दौऱ्यात संघाचे नेतृत्व धवन करणार आहे. तर इंग्लंड दौऱ्याआधी भारत मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि आयर्लंड दौऱ्यात टी२० मालिका खेळला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताचे नेतृत्व पंत याने केले होते. ही मालिका २-२ अशी बरोबरीत आली असताना पाचवा सामना पावसामुळे रद्द झाला होता. या मालिकेत आधी रोहितच संघाचे नेतृत्व करणार होता, मात्र तो जखमी झाल्याने ती जबाबदारी केएल राहुल (KL Rahul) याच्यावर सोपवण्यात आली. राहुलही मालिका सुरू होण्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला होता.
रोहित, विराट, चेतेश्वर पुजारा इत्यादी वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यात कसोटी सामन्यासाठी व्यस्त होते. यामुळे बीसीसीआयने दुसरा भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यासाठी निवडला. यामध्ये पंड्याने संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. या दौऱ्यात दोन टी२० सामने खेळले गेले. हे दोन्ही सामने भारताने जिंकले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘टी२० विश्वचषकानंतर बरेच खेळाडू निवृत्त होऊ शकतात’, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचे मोठे संकेत
दुसऱ्या टी२०पूर्वी कर्णधार बटलरची संघासोबत ‘खास मीटिंग’, खेळाडूंना सांगितला विजयाचा मंत्र
‘तो’ नसता तर, अजूनही टीम इंडियाची दुसऱ्या वनडे विश्वविजयाची प्रतिक्षा कायमच असती…!