मुंबई । ऑस्ट्रेलियामध्ये होणारा 2020 सालचा टी 20 विश्वचषक तहकूब झाल्यानंतर, पुढील वर्षी टी 20 विश्वकरंडक कोणत्या देशात होणार आहे, असा प्रश्न पडला होता? आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
शुक्रवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत 2021 टी 20 विश्वचषक भारतात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2022 टी -20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होईल. त्याचबरोबर वेळापत्रकानुसार 2023 चा वनडे विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे. आयसीसीच्या या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुखही सहभागी झाले होते.
बीसीसीआयला 2021 मध्ये टी -20 विश्वचषक आयोजित करण्याची इच्छा होती. वास्तविक, बीसीसीआय ला 2023 मध्ये वनडे विश्वचषक आयोजित करायचा आहे. जर बीसीसीआयने 2022 टी 20 विश्वचषक आयोजित करायचा ठरले असते तर वर्षात दोन विश्वचषक त्याच्यासाठी भरविणे अवघड ठरू शकेल असते.
बीसीसीआयला 2021 टी -20 वर्ल्ड कपचे आयोजण करण्याचा मान मिळताच क्रिकेट ऑस्ट्रेलियाची तयारी वाया गेलेली आहे. त्यांनी 2020 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी संपूर्ण तयारी केली होती पण कोरोना विषाणूमुळे टी 20 विश्वचषक पुढे ढकलण्यात आला. आता त्यांना 2022 साठी पुन्हा सर्वकाही तयार करावे लागेल.