मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स क्लब ऑफ इंफॅन्ट जेसुस हायस्कुल यांच्यावतीने ‘द आयजेएचएस स्पोर्ट्स मीट २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. या इव्हेंट मध्ये वसई तालुका मर्यादित शालेय कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आला आहे.
आज १५ नोव्हेंबर २०१९ ते १७ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा इंफॅन्ट जेसुस हायस्कुलच्या मैदानावर (नालासोपारा पूर्व) होणार आहे. प्रथमच वसई तालुक्यात शालेय कबड्डी स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येणार असून दोन मॅटची मैदाने तयार करण्यात आली आहेत.
मुलांचे ७८ संघ तर मुलींचे ४० संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यामध्ये १२ वर्षाखालील, १४ वर्षाखालील आणि १६ वर्षाखालील असे ३ गटात स्पर्धा होतील. आज स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी वसई तालुका कबड्डी असोसिएशनचे चेरमॅन श्री.एम. एस. दुतोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.