fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगभरात अनेक क्रिकेटर झाले, परंतु असा विक्रम केवळ रोहितच्याच नावावर

May 20, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मर्यादित षटकांच्या भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने त्याच्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत चाहत्यांसाठी अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहे. त्याच्या दमदार फटकेबाजीला आज जगभरातील गोलंदाज घाबरतात. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशहा म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वनडेत रोहितच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. परंतु, त्या सर्व विक्रमांमध्ये एक कमालीचा विक्रमही आहे, ज्याच्याविषयी खूप कमी क्रिकेटप्रेमींना माहिती असेल.

हिटमॅन रोहित हा वनडेत सलग १० वनडे मालिकेत शतक ठोकणारा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने याची सुरुवात २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केली होती आणि त्याचा शेवट त्याने २०१९मध्ये ऑस्ट्रेलियामधील वनडे मालिकेत केला.

२०१७-२०१९ यादरम्यान रोहितने ८ वनडे मालिका आणि २ वनडे स्पर्धा खेळल्या. या एकूण १० वनडे मालिका किंवा स्पर्धांमध्ये रोहितने कमीत कमी एक तरी शतक ठोकले आहे. २०१७मध्ये त्याने श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील प्रत्येक मालिकेत एक शतक जडले होते.

त्यानंतर दुबईतील आशिया चषक स्पर्धेत रोहितने वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत एकदा तरी शतकी खेळी केल्या होत्या. तो एवढा अफलातून विक्रम करणारा जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्यापुर्वी आणि त्याच्यानंतर असा विक्रम आजवर कुणीही केलेला नाही.

विशेष म्हणजे, रोहितने २०१७ पासून ते २०१९पर्यंत खेळलेल्या वनडे मालिकेत एकूण १८ शतके केली होती. त्याच्यानंतर २०१७ ते २०१९मध्ये सर्वाधिक षटकार करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीचे नाव येते. त्याने एकूण १७ शतके केली होती.

ट्रेंडिंग घडामोडी- 

४ महिन्यात २ विश्वचषकांचे आयोजन करु शकतो भारत देश

धोनीच्या फॅन्सने या कारणामुळे आकाश चोप्रा व परिवाराला दिल्या होत्या…

हाॅस्पिटलमध्ये कोरोनाशी लढतोय फॅन, अचानक या खेळाडूने केला फोन


Previous Post

७० शतकं केलेला विराट म्हणतो, या गोलंदाजापुढे ठरलो होतो मुर्ख

Next Post

कसोटी क्रिकेटमध्ये कधीही अव्वल स्थानी न आलेले महान खेळाडू

Related Posts

Photo Courtesy:
Twitter/ICC
क्रिकेट

मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

कर्णधारपद सांभाळण्यासाठी रिषभ पंत घेतोय दिल्ली संघातील ‘या’ खेळाडूंची मदत

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘काय करायचं, ही बॅटिंग लाईनअप संपतच नाही’, भारतीय दिग्गजाचा सीएसकेच्या संघाला पाहून सवाल

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘गब्बर’ची चेन्नईवर दादागिरी! धवनने घातली ‘या’ मोठ्या विक्रमला गवसणी

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला वादळी खेळीने घाम फोडणाऱ्या २१ वर्षीय पृथ्वी शॉने केली गिलची बरोबरी आता केवळ पंत आहे पुढे

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

लईच वाईट!! पहिल्याच सामन्यात एमएस धोनी क्लिन बोल्ड, पाहा व्हिडिओ

April 10, 2021
Next Post

कसोटी क्रिकेटमध्ये कधीही अव्वल स्थानी न आलेले महान खेळाडू

प्रत्येक क्रिकेट प्रेमीने आवर्जून पाहाव्यात अशा ‘युवी’च्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ‘या’ १० सर्वोत्कृष्ट खेळी

हा फलंदाज खेळला नसता तर टीम इंडियाने कदाचीत कधीच केली नसती फटकेबाजी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.