इंडियन प्रीमियर लीग २०२० स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू सूर्यकुमार यादव तुफान फॉर्ममध्ये होता. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेला सामना आजही सर्वांना लक्षात असेल. याच सामन्यात सूर्यकुमार यादवने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. दरम्यान, मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यावेळी त्याने आगळे वेगळे सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले होते. आता त्याने या सेलिब्रेशनमागचे खरे कारण काय होते, याचा खुलासा केला आहे.
सूर्यकुमार यादवने सामना संपवल्यानंतर ‘मी आहे ना’ अशा प्रकारचे इशारे केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनची बरीच चर्चा झाली होती.
क्रिकेट प्रेसेंटर विक्रम साठेसोबत बोलताना सूर्यकुमार यादवने म्हटले की, “माझ्या कुटुंबीयांना असे वाटत होते की, जेव्हा मी खेळपट्टीवर जाऊ, तेव्हा सामना संपवून माघारी येऊ. स्पर्धा सुरू असताना अनेकांनी मला म्हटले होते की, ‘तू धावा करतोय, तू प्रत्येक सामन्यात योगदान देतोय. परंतु, आम्हाला तुला सामना समाप्त करताना पहायचं आहे.”
तसेच त्याने जुन्या आठवणींना उजाळा देत म्हटले की, “त्या हंगामात आयपीएल स्पर्धेतील अर्ध्यापेक्षा जास्त सामने झाले होते. मला अजूनही आठवण आहे की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा होणार होती. मी आयपीएल २०१९ स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्यानंतर २०२० स्पर्धेत देखील मी चांगले प्रदर्शन केले होते. मला वाटत होते की, माझी निवड होईल. परंतु असे झाले नव्हते. त्यामुळे मी निराश झालो होतो.”
“मी निराश होतो, त्या सामन्यात मला चांगली कामगिरी करायची होती. जेव्हा मी संघाला विजय मिळवून दिला त्यावेळी मी ड्रेसिंग रूमकडे पाहिले जिथे माझे कुटुंबातील सदस्य बसले होते. हे सर्व आपोआप झाले, मी काहीच ठरवलं नव्हतं. तिथे जे काही घडत होतं ते परिस्थितीनुसार घडत गेलं,” असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
That's that from Match 48 as @mipaltan win by 5 wickets.@surya_14kumar with an unbeaten 79.
Scorecard – https://t.co/XWqNw97Zzc #Dream11IPL pic.twitter.com/ESHhCYRBik
— IndianPremierLeague (@IPL) October 28, 2020
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघाने सूर्यकुमार यादवला रिटेन केले आहे. त्याला ८ कोटी रुपये खर्च करून मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केले आहे. येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची निवड होणार आहे. या संघात सूर्यकुमार यादवला देखील स्थान दिले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या :
मिशन वर्ल्डकप! श्रीलंका क्रिकेट बोर्डाने जयवर्धनेवर सोपवली मोठी जबाबदारी
“खराब फॉर्ममध्ये असूनही विराट संघासाठी योगदान देतोय”
चिंतेचा डोंगर डोक्यावर घेऊन साहा खेळला न्यूझीलंडविरुद्धची मालिका; वाचा काय घडलेले