इंडियन प्रीमियर लीग २०२१ सुरू असताना बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे २९ सामन्यानंतर या लीगला स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये घेण्याचे निश्चित केले आहे. हे उर्वरित सामने बीसीसीआयने संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये आयोजित केले आहेत. याच दरम्यान न्यूझीलंड क्रिकेट संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने गुरुवारी (०५ ऑगस्ट) याची घोषणा केली आहे. तब्बल १८ वर्षांनंतर न्यूझीलंड क्रिकेट संघाचा हा पहिला पाकिस्तान दौरा असणार आहे. या दौऱ्यावर उभय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहेत.
तीन एकदिवसीय सामने आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग असणार आहेत. तीनही एकदिवसीय सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर पाच टी२० आंतरराष्ट्रीय सामने गद्दाफी स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.
या मालिकेनंतर काही दिवसांनी टी २० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ही पाच सामन्यांची टी२० मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड संघ १ ते १० सप्टेंबर दरम्यान बांगलादेशमध्ये पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका देखील खेळली जाणार आहे.
PCB confirms schedule of New Zealand’s first tour of Pakistan in 18 years.#PAKvNZ | #HarHaalMainCricket pic.twitter.com/dPlThiKuGT
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 5, 2021
न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक-
एकदिवसीय मालिका
पहिला सामना- १७ सप्टेंबर, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
दुसरा सामना- १९ सप्टेंबर, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
तिसरा सामना- २१ सप्टेंबर, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
टी२० मालिका
पहिला सामना- २५ सप्टेंबर, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
दुसरा सामना- २६ सप्टेंबर, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
तिसरा सामना- २९ सप्टेंबर, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
चौथा सामना- १ ऑक्टोबर, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
पाचवा सामना- ३ ऑक्टोबर, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
महत्त्वाच्या बातम्या-
पिछाडीवर असलेल्या SRHला मिळणार बळ! ‘यॉर्कर किंग’ नटराजन पुनरागमनासाठी गाळतोय घाम
पत्रकाराच्या लांबलचक प्रश्नावर वैतागलेल्या कोहलीचे तिखट उत्तर; नेटकरी म्हणाले, ‘घनघोर अपमान’
ऑस्ट्रेलियाचे पुन्हा लोटांगण, बांगलादेशने जिंकला सलग तिसरा टी२० सामना; रिकॉर्ड बुकमध्ये मिळवली जागा