श्रीलंका संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. शनिवारपासून (२६ डिसेंबर) सेन्चुरियन येथील मैदानावर चालू असलेल्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याने या दौऱ्याचा श्रीगणेशा झाला आहे. या सामन्याच्या दुसरा दिवसाखेर श्रीलंका संघ ६ बाद ३४० धावांवर आहे. या सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी ठरलेल्या नियमानुसार नाणेफेक करण्यात आली. यावेळी श्रीलंका संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याच्यासोबत अतिशय मजेशीर घटना घडली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचे खूप हसू होत आहे.
झाले असे की, नाणेफेक झाल्यानंतर श्रीलंका कसोटी संघाचा कर्णधार दिमुथ समालोचकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. यावेळी बोलत असताना टीव्हीवर त्याचे नाव दिमुथ करुणारत्ने ऐवजी दिमुथ डी कॉक असे दाखवले गेले. जेव्हा दर्शकांच्या नजरेस ही चूक आली, तेव्हा त्यांनी दिमुथचे हसू करण्याची संधी सोडली नाही. काही दर्शकांनी टीव्हीवर दिमुथच्या नावापुढे डी कॉक असे आडनाव जोडलेले दाखवतानाचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर तो पोस्ट केला.
Never knew Dimuth changed his surname in South Africa. 😂😂😂 pic.twitter.com/TUztPeBFVi
— Roshan Abeysinghe (@RoshanCricket) December 27, 2020
त्यानंतर नेटकऱ्यांनी दिमुथ दक्षिण आफ्रिकाचा कर्णधार बनला आहे, दिमुथने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेल्यानंतर आपले आडनाव बदलले असल्याचे वृत्त माहिती नव्हते, अशा शब्दात त्याची थट्टा केली.
खरे तर, दिमुथचे आडनाव करुणारत्ने आहे. परंतु टीव्हीवरुन सामन्याचे थेट प्रक्षेपण होत असताना चुकीने त्याच्या आडनावाऐवजी दक्षिण आफ्रिका कसोटी संघाचा कर्णधार क्विंटन डी कॉकचे आडनाव त्याच्या नावापुढे जोडले गेले.
सामन्याची आकडेवारी
बॉक्सिंग डे कसोटीत श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर ३४० धावा केल्या आहेत. दसुन शन्का आणि कसुन रजीता नाबाद फलंदाजी करत आहेत. बाद झालेल्या खेळाडूंमध्ये दिनेश चंडीमलने सर्वाधिक ८५ धावा केल्या आहेत. ११ चौकारांच्या मदतीने त्याने ही धावसंख्या गाठली. तसेच धनंजया डी सिल्वानेही ७९ धावांची खेळी केली. कर्णधार दिमुथ करुणारत्ने सलामीला फलंदाजीला येत अवघ्या २० धावांवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ : नॅथन लायनच्या फिरकीत हनुमा विहारी आडकला, झाला ‘असा’ बाद
ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर जे कोणत्याही भारतीय फलंदाजाला नाही जमलं, ते एकट्या पंतने करून दाखवलं
वा रे वा….! असे ३ कर्णधार ज्यांनी आयसीसी स्पर्धांमध्ये केली सर्वाधिक शतकं, ‘हा’ भारतीय अव्वल स्थानी