भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या १८ जून ते २२ जूनदरम्यान विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. एकीकडे भारतीय संघ कसून सराव करण्यात व्यस्त आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघाने नुकेतेच इंग्लंड संघाला कसोटी मालिकेत १-० ने धूळ चारली आहे. त्यामुळे दोन्हीही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल यात काही शंका नाही.
तसेच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी किवी कर्णधार केन विलियम्सन दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळणार का? याबाबत टॉम लेथमने स्पष्टीकरण दिले आहे.
न्यूझीलंडचा फलंदाज टॉम लॅथमने म्हटले की, “केन विलियम्सन ठीक होत आहे. त्याच्यासाठी विश्रांती करणे आणि पुढच्या आठवड्यापर्यंत ठीक होणे गरजेचे होते. त्यामुळे मला असे वाटते की, तो येत्या एक किंवा दोन दिवसात फिटनेस चाचणीमधून जाईल, म्हणजे तो तंदुरुस्त होईल. तो मैदानात उतरण्यास तयार आहे. त्याच्या येण्याने आमच्याकडे एक तंदुरुस्त संघ असेल.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आम्ही कुठल्या एका खेळाडूवर निर्भर नाही. मला असे वाटते की, हे संपूर्ण संघाचे प्रदर्शन आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळे खेळाडू प्रदर्शन करत असतात. तसेच अनेक असे खेळाडू आहेत, जे या संघात गेल्या अनेक वर्षांपासून आहेत.” (Tom Latham says kane Williamson will be fit and set to play against india)
तसेच भारतीय संघाबद्दल बोलताना लेथम म्हणाला, “भारतीय संघाविरुद्ध खेळताना आम्हाला चारही बाजूने धोका असेल. त्यांच्याकडे गोलंदाजांचा चांगला सेट आहे. असे अनेक दर्जेदार फलंदाज आहेत, ज्यांनी जगभरात वेगवेगळ्या परिस्थितीत धावा केल्या आहेत. ते काही वर्षांपूर्वी येथे होते आणि खरोखर चांगले खेळले म्हणून आम्हाला माहित आहे की त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला खरोखरच चांगले खेळावे लागेल.”
न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. तब्बल २२ वर्षानंतर न्यूझीलंड संघाला इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे. त्यामुळे त्यांना कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यातील विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
डेविडने भारतीय संघाला केले ‘वॉर्न’; सांगितले, WTC अंतिम सामन्यात ‘हा’ अष्टपैलू हवाच
रेसलर जॉन सीना आहे विराट कोहलीचा चाहता? ‘ती’ पोस्ट पाहून चाहते पडले गोंधळात