आयपीएल 2020 मध्ये आपल्या फिरकीने सर्वाना प्रभावित करणारा तमिळनाडूचा युवा फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे तो आता सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही. या स्पर्धेचे आयोजन 10 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत असणार आहे. ही स्पर्धा 6 विभागात खेळली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वरुण चक्रवर्ती आता आपल्या खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे आणि सध्या तो 12 आठवड्याच्या रिहॅबिलिटेशन प्रक्रियेतून जात आहे. या प्रकरणाशी जोडल्या गेलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार वरुण चक्रवर्ती सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार नाही.
वरुण चक्रवर्ती आयपीएलच्या तेराव्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता आणि त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते. त्याने एका डावात 5 विकेट्स घेण्याचा करारनामा सुद्धा केला होता. त्यामुळे त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली होती.
दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून घेतली होती माघार
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड झाल्यानंतर वरुण दुर्दैवी ठरला कारण त्याला दुखापत झाली. यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौर्यावर जावू शकला नव्हता आणि आता सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सहभागी होणार नाही. त्याच्यासाठी निश्चितपणे हा एक मोठा धक्का असणार आहे.
तामिळनाडू संघाबद्दल बोलायचे तर या स्पर्धेत आर अश्विन, टी नटराजन, आणि वाशिंग्टन सुंदर सारखे दिग्गज खेळाडू सैयद मुश्ताक अली स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार नाहीत. हे तीन खेळाडू ऑस्ट्रेलियात दौऱ्यात आहेत. त्या ठिकाणी कसोटी मालिकेत खेळणार आहेत.
परंतु अष्टपैलू खेळाडू विजय शंकर, जो हॅमस्ट्रींगचा बळी ठरला होता, तो आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे त्याला तामिळनाडूच्या संभाव्य खेळाडूच्या यादीत सामील केले जाऊ शकते. तमिळनाडू संघाचा 10 दिवसाचा कॅम्प चेन्नई येथे लागणार आहे. त्यानंतर संघाची अंतिम निवड होईल. मागील सत्रात तामिळनाडूचा संघ रनर-अप राहिला होता. यंदा मात्र हा संघ आपले सामने कोलकाता येथे खेळेल.
संबधित बातम्या:
– शुभमंगल.! प्रेयसीने टाकलेल्या गुगलीवर पडली फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची विकेट; विवाहाचे फोटो व्हायरल
– तो परत येतोय! मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतून श्रीसंत पुनरागमन करण्याची शक्यता
– युवा खेळाडूंना आयपीएल लिलावापूर्वी मिळणार व्यासपीठ, मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा जाहीर