विकी ओस्तवाल(Vicky ostawal) १९ वर्षाखालील विश्वचषक (u19 world cup) जिंकलेल्या भारतीय संघाचा भाग होता. त्याला १२ आणि १३ फेब्रुवारीला बेंगलोर येथे पार पडलेल्या आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात( IPL 2022 Mega auction) दिल्ली कॅपीटल्स संघाने २० लाख देऊन खरेदी केले आहे. यानंतर त्याने दिल्ली संघाचे आभार मानले आहेत. तसेच त्याने त्याच्या आदर्श क्रिकेट खेळाडूचाही खुलासा केला आहे.
ओस्तवालने आयपीएलच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटल आहे की, “मी बालपणापासून आयपीएल पाहत आहे. आयपीएलमध्ये खेळण्याचे स्वप्न नेहमीच होते. कारण, हा सर्वात मोठा प्लॅटफाॅर्म आहे जो तुम्हाला मिळू शकतो. या वर्षीच्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने माझी निवड केल्याने मी खुप आभारी आहे. मी माझ्या खोलीत लिलाव पाहत होतो आणि माझे नाव खुप उशिरा आले. १९ वर्षाखालील विश्वचषकात मी चांगली कामगिरी केली होती हे मला माहित होते. मला वाटले की कदाचीत मला निवडले जाणार नाही. दोन दिवस मी खुप काळजीत होतो आणि डीसीने मला बोली लावल्यानंतर खुप आनंद झाला.”
ओस्तवाल पुढे म्हणाला की, “मला हे माहित नाही की, मला खेळण्याची संधी मिळेल की नाही. पण, शिकायला सतत मिळेल. काही महान खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे ही माझ्यासाठी खुप मोठी शिकवण असेल. ज्या क्षणी मला लिलावात निवडले तेव्हा मला यश धुलचा व्हिडीओ काॅल आला. तो खूप आनंदी होता.” १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार यश धुलला लिलावाच्या दुसऱ्या दिवशी ५० लाख रुपये देऊन दिल्लीने खरेदी केले आहे.
ओस्तवाल पुढे म्हणाला की, “त्याने भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला नेहमीच आपला आदर्श मानले आहे. कारण तो फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींमध्ये योगदान देतो. तो म्हणाला, “मी नेहमीच रवींद्र जडेजाला माझा आदर्श मानतो. तो माझा आदर्श आहे. तो गोलंदाजी, फलंदाजी आणि मुख्य म्हणजे क्षेत्ररक्षणात योगदान देतो. तो प्रत्येक संघाला हवा असलेला खेळाडू आहे.”
महत्वाच्या बातम्या-
बंगालच्या क्रीडामंत्र्यांनी रणजीच्या रणांगणात रचला इतिहास! (mahasports.in)