भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील कसोटी मालिका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथील दिवसरात्र सामन्याने या मालिकेची सुरुवात होईल. तत्पुर्वी दोन्ही संघाचे खेळाडू नेटमध्ये घाम गाळत आहेत. अशात भारतीय संघाचा सराव सत्रामधील एक व्हिडिओ पुढे आला आहे. या व्हिडिओत भारतीय क्रिकेटपटू अनोख्या अंदाजात सराव करत आहेत.
आपणा सर्वांना माहिती आहे की, व्यायाम करण्यापुर्वी नेहमी हलकासा वाॅर्म अप केला जातो. क्रिकेटबाबतीतही अगदी असेच असते. सराव सत्रात फलंदाजी, गोलंदाजी आणि यष्टीरक्षणाचा सराव करण्यापुर्वी खेळाडू वाॅर्म अप करतात. स्ट्रेचिंग, धावणे, उठा बशा काढणे असे काही व्यायाम या दरम्यान केले जातात. परंतु, भारतीय क्रिकेटपटू सराव सत्रात चक्क कुस्ती खेळताना दिसत आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रकारे सर्व खेळाडू सराव सत्राचा आनंद लुटताना दिसत आहेत.
https://www.facebook.com/watch/?v=130014538795693
असे असले तरी, भारतीय कसोटी संघाता विस्फोटक फलंदाज रोहित शर्मा या सराव सत्राचा भाग नाही. कारण तो नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. लवकरच तो ऑस्ट्रेलियात दाखल होईल आणि क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय संघासोबत सामील होईल.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
१७ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान ऍडलेड येथे पहिला कसोटी सामना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होणारा हा सामना मालिकेतील एकमेव दिवसरात्र सामना असेल. त्यानंतर २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान मेलबर्न येथे दुसरा बॉक्सिंग डे सामना होईल. तर नववर्षात सिडनीमध्ये तिसरा आणि ब्रिसबेनमध्ये चौथा सामना होईल. ७ जानेवारी ते ११ जानेवारी दरम्यान तिसरा आणि १५ जानेवारी १९ जानेवारी दरम्यान चौथा, असे हे सामने होतील.
असा आहे भारतीय कसोटी संघ-
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, शुबमन गिल, रोहित शर्मा, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा, आर अश्विन, केएल राहुल, वृद्धिमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, कुलदिप यादव
असा आहे ऑस्ट्रेलियन कसोटी संघ-
टीम पेन (कर्णधार), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मोझेस हेन्रीक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकल नेसर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी रहाणेला सुखद धक्का; कसोटी क्रमवारीत टॉप-१० मध्ये झेप
‘या’ फलंदाजाने करावी ऑस्ट्रेलियासाठी सलामीला फलंदाजी, माजी फलंदाज ब्रॅड हॅडिनचे मत