नागपूर, 2 जून 2023: महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र इंटरनॅशनल चेस फेस्टीव्हलमध्ये पहिल्या फेरीत आकर्षक विजय मिळवणाऱ्या विदित गुजराथी व रौनक साधवानी यांना चॅलेंज लढतीच्या दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. विदितला पीटर स्विडलर कडून तर, रौनकला नायजेल शॉर्टकडून पराभव पत्करावा लागला. तो अखेरच्या काही सेकंदात वेळ कमी पडल्यामुळेच. दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीअखेर लुका पैचाज, व्हीएस राहुल, सम्मेद शेटे, एस हर्षद आघाडीवर हे खेळाडू ३ गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर आहेत.
नागपूरमधील नैवेद्यम नॉर्थस्टार संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत नायजेल शॉर्ट विरुद्ध फ्रेंच डिफेन्सच्या गुंतागुंतीला तोंड न देता आल्यामुळे रौनकला पराभवाचा सामना करावा लागला. १९९० च्या दशकात अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या फ्रेंच डिफेन्सवर नायजेल शॉर्टने नुकतेच पुस्तकही लिहिले आहे.
मी माझ्या संपूर्ण आयुष्यभर फ्रेंच डिफेन्सचाच वापर केला आहे. मात्र त्यातील कितीवेळा विजय मिळवता आले आहे हे मात्र सांगता येणार नाही, असे शॉर्टने विजयानंतर सांगितले. त्याआधी रौनक याने विनावर व्हेरिएशनचा वापर करताना आपला राजा मध्यभागी ठेऊन वजिराच्या बाजूला असलेल्या शॉर्टच्या राजावर आक्रमण केले होते. मात्र, वजीर व हत्त्तीच्या साहाय्याने केलेले हे आक्रमण परिणामकारक ठरले नाही. एकीकडे रौनकला वेळ कमी पडू लागला असतानाच शॉर्टने आक्रमक भूमिका घेतली व रौनकला ३५व्या चालीत शरणागती पत्करावी लागली.
स्विडलर आणि विदित यांच्यातील लढतीत ताराश व्हेरिएशन मधून प्रारंभ केल्यावर दोन्ही खेळाडूंनी प्रारंभी चालीतच बराच वेळ गमावला. विदितच्या वजिराने स्विडलरच्या क्षेत्रात धडक मारण्याचा प्रयत्न केला. परंतु स्विडलरने १७व्या चालीला वाजीरावजिरी करण्यास भाग पडल्यावर विदितकडून मोठी चूक झाली. त्याच्या चुकीचा फायदा घेत स्विडलरने विदितची अनेक मोहरी मारली. डावाच्या अखेरीस हत्ती व प्यादी शिल्लक असताना स्विडलरने आपले प्यादे अखेरपर्यंत नेऊन ३९व्या चालीला विजय मिळवला.
डावाच्या सुरुवातीला मला फारसा आत्मविश्वास वाटत नव्हता. परंतु उत्तरार्धात विदितने केलेल्या चालींच्या निवडीमुळे तो दुर्दैवी ठरला व मला विजय मिळवता आला, असे स्विडलरने दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीत अग्रमानांकित बोरिस सॅव्हचेन्कोला आर्मेनियाच्या आर्मेन बारसेग्यानने चुरशीच्या लढतीतनंर ७७चालीत बरोबरीत रोखले. तिसऱ्या फेरीतील धक्कादायक निकालामध्ये ग्रँडमास्टर वेंकटेशला राहुलकडून तर, ग्रँडमास्टर मिरझोव्ह अझरला हर्षद कडून पराभव पत्करावा लागला. गौतम कृष्णाने आंतरराष्ट्रीय मास्टर निलेश सहाला पराभूत करताना आगेकूच कायम राखली.
तत्पूर्वी पहिल्या फेरीत आघाडीच्या खेळाडूंना एकतर पराभवाचा सामना करावा लागला असताना किंवा त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली असताना दुसऱ्या फेरीत मात्र मानांकित खेळाडूंनी आगेकूच केली. मात्र, महाराष्ट्राच्या सृष्टी पांडेने ग्रँडमास्टर झाकरतसोव्हला मयंक चक्रवर्तीने आठव्या मानांकित अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज बरोबरीत रोखले.त्याच वेळी बोरिस सॅव्हचेन्को निरंजन नवलगूड विरुद्ध इटलियन ओपनिंगच्या साहाय्याने विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: दुसरी फेरी: चॅलेंज स्पर्धा:
पीटर स्विडलर(3गुण )वि. वि. विदित गुजराथी(3);
रौनक साधवानी(3)पराभूत वि. नायजेल शॉर्ट(3);
महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा: तिसरी फेरी:
आर्मेन बरेघ्यान आमेन (२.५गुण) बरोबरी वि. बोरिस सॅव्हचेन्को(२.५ गुण);
सम्मेद शेटे(३गुण)वि.वि.बाबुजियन लेव्हॉन (२गुण);
मिरझोव्ह अझर(२गुण)पराभूत वि.हर्षद एस (३गुण);
राहुल व्ही एस (३गुण)वि.वि.एम आर व्यंकटेश (२गुण);
बर्माकिन व्लादिमीर(२.५गुण)बरोबरी वि.संकेत चक्रवर्ती (२.५गुण);
रित्विज परब (२गुण)पराभूत वि.लुका पैचाज (३गुण);
झाकरतसोव्ह वायचेसलाव्ह(२.५गुण)वि.वि.सिद्धांत गायकवाड(२गुण);
अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज (२.५गुण)वि.वि.पांडे सृष्टी(१.५गुण) ;
दीप सेनगुप्ता (२गुण)बरोबरी वि. भट्टाचार्य सोहम (२गुण);
(Vidit Gujarathi and Raunak Sadhwani suffer defeat in second round of Maharashtra International Chess Festival)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! पहिल्या दोन ऍशेस सामन्यांसाठी इंग्लंड संघाची घोषणा, अँडरसन ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धोका
मैदान गाजवलं! ओली पोपचे वेगवान द्विशतक, मायदेशातील 41 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला