रनमशीन या टोपणनावाने ओखळल्या जाणाऱ्या विराट कोहलीने क्रिकेटविश्वात अनेक मोठे विक्रम रचले आहेत. तो आशिया कप 2022च्या आधीपासून आऊट ऑफ फॉर्म होता. त्यावेळीही तो धावा करत होता, मात्र शतक काही त्याच्या बॅटमधून निघत नव्हते. अशा स्थितीत त्याने हार न मानता काही वेळ ब्रेक घेतला आणि आशिया कप 2022मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतकी खेळी केली. तोच फॉर्म त्याने टी20 विश्वचषकातही कायम राखला. आता तो घरच्या मैदानावर 2023चा पहिला सामना खेळला. त्यामध्ये त्याने विश्वविक्रम केला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात मंगळवारी (10 जानेवारी) मालिकेतील पहिला वनडे सामना खेळला गेला. गुवाहाटीत झालेल्या या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने जबरदस्त फलंदाजी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. तो वनडे क्रिकेटच्या इतिहासात जलद 12500 धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ही कामगिरी 257 डावांमध्येच पूर्ण केली आहे. ही कामगिरी करताना त्याने सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटींग, कुमार संगकारा, सनथ जयसुर्या आणि माहेला जयवर्धने या दिग्गजांना मागे टाकले आहे.
भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर याला वनडेमध्ये 12500 धावांचा टप्पा गाठण्यासाठी 310 डाव खेळावे लागले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉंटींगला 328 डाव लागले होते. तर श्रीलंकेच्या संगकाराला 345, जयसूर्याला 402 आणि जयवर्धने ला 411 डाव लागले होते.
या सामन्यात विराटने 47 चेंडूत षटकार मारत 65वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. तर 80 चेंडूत कारकिर्दीतील 45वे वनडे शतक पूर्ण केले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 73वे शतक ठरले. या सामन्यात तो 87 चेंडूत 113 धावा करत बाद झाला. यामध्ये त्याने 12 चौकार आणि एक षटकार मारला.
Back to back ODI hundreds for @imVkohli 👏👏
Live – https://t.co/MB6gfx9iRy #INDvSL @mastercardindia pic.twitter.com/Crmm45NLNq
— BCCI (@BCCI) January 10, 2023
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बरसापरा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या या सामन्यात भारतीय खेळाडूंनी प्रथम फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला, पहिले तर कर्णधार रोहित शर्माने 67 चेंडूत 83 धावा केल्या, शुबमन गिलनेही 70 धावा जोडल्या. यामुळे भारताने 50 षटकात 7 विकेट्स गमावत 373 धावासंख्या उभारली.
वनडेमध्ये सर्वात जलद 12500 धावा (डावानुसार)-
257 – विराट कोहली*
310 – सचिन तेंडुलकर
328 – रिकी पाँटिंग
345 – कुमार संगकारा
402 – सनथ जयसूर्या
411 – माहेला जयवर्धने
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत कोहलीच विराट! श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढत ठोकले 45 वे वनडे शतक
गिलने टीकाकरांना केले शांत! चौकारांचा पाऊस पाडत ‘या’ यादीत श्रेयस, विराटला टाकले मागे