भारत आणि श्रीलंका (INDvSL) यांच्यादरम्यान वनडे मालिकेतील पहिला मंगळवारी (10 जानेवारी) खेळला गेला. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. विराटने या सामन्यात आपल्या वनडे कारकिर्दीतील 45 वे शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने मायदेशात सर्वाधिक वनडे शतक झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली.
शुबमन गिल बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या विराटने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. खराब चेंडूवर चौकार षटकार आणि चांगल्या चेंडूवर एकेरी दुहेरी धावा घेत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतरही, गोलंदाजांवर त्याने वर्चस्व गाजवत 80 चेंडूंवर आपल्या 45 व्या वनडे शतकाला गवसणी घातली. यामध्ये 10 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. विराटने बाद होण्यापूर्वी 87 चेंडूंमध्ये 13 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 113 धावांची खेळी केली.
विराटचे हे मायदेशातील 20 वे वनडे शतक ठरले. या शतकासह त्याने मायदेशातील सर्वाधिक वन डे शतक करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर याची बरोबरी केली. सचिनने आपल्या कारकिर्दीत 49 वनडे शतक बनवलेली. विराटचा विचार केल्यास विराटने मायदेशातील 20 वनडे शतके पूर्ण करण्यासाठी केवळ 99 डाव घेतले आहेत. यामध्ये 20 शतके व 25 अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहली तीन वर्षापासून शतक झळकावण्यात अपयशी ठरत होता. मात्र, आशिया चषकात अफगाणिस्तान विरुद्ध शतक ठोकत त्याने हा दुष्काळ संपवला. मागील महिन्यात बांगलादेश विरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याने शतक झळकावले होते. नंतर आता सलग दुसऱ्या सामन्यात त्याने शतक पूर्ण केले.
(Virat Kohli Complete 20 ODI Hundred On Home Soil Equal Sachin Tendulkar Record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडेत कोहलीच विराट! श्रीलंकन गोलंदाजांची पिसे काढत ठोकले 45 वे वनडे शतक
गिलने टीकाकरांना केले शांत! चौकारांचा पाऊस पाडत ‘या’ यादीत श्रेयस, विराटला टाकले मागे