रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं प्रथम फलंदाजी करताना 222 धावांची मोठी मजल मारली. धावांचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीकडून विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सलामीला आले. या दोघांनी संघाला तुफानी सुरुवात करून दिली. मात्र तिसऱ्या षटकात विराट कोहली बाद झाला, ज्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
केकेआरसाठी तिसऱ्या षटकात हर्षित राणा गोलंदाजीला आला. त्यानं ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फुल टॉस बॉल टाकला, ज्यावर कोहलीनं बॅटनं बचाव केला. मात्र चेंडू हवेत उसळला आणि हर्षित राणानं त्याचा झेल घेतला. झेल घेतल्यानंतर कोहलीनं लगेचच डीआरएसची मागणी केली, कारण त्याच्या मते तो नो-बॉल होता.
विराट कोहलीला बॉल बॅटवर फुल टॉस येईल अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. हर्षितनं झेल घेतला, ज्यावर पंचांनी रिव्ह्यू घेतला. कोहलीला हा नो-बॉल असल्याची खात्री पटली होती. परंतु रिव्ह्यू पाहिला असता चेंडूची उंची नो-बॉलच्या रेषेच्या खाली होती. हे पाहून कोहलीनं मैदानावर उपस्थित पंचांशी जोरदार वाद घातला.
कोहलीचं बाद होणं वादाचं कारण ठरलं कारण जेव्हा त्याचा झेल हवेत उडाला तेव्हा कोहली क्रीजच्या बाहेर उभा होता. रिव्ह्यू पाहता, समालोचकांनी असाही दावा केला की, जर कोहली क्रीजच्या बाहेर आला नसता तर चेंडू नो-बॉलसाठी निर्धारित उंचीपेक्षा खाली राहिला असता. असं असूनही, जेव्हा टीव्ही अंपायरनं निर्णय जाहीर केला तेव्हा कोहली डोके हलवत डगआउटकडे गेला. तो अंपायरच्या या निर्णयावर बिलकुल खूष नव्हता. त्यानं अवघ्या 7 चेंडूत 18 धावा केल्या होत्या.
या वादामुळे स्मार्ट रिव्ह्यू सिस्टीम आणि बॉल ट्रॅकिंग सिस्टीमवर प्रश्न निर्माण झाले आहेत. कोहलीनं मैदान सोडल्यानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसही अंपायरला हे सर्व कसं घडलं हे विचारताना दिसला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईनं रोहित शर्माला काढून हार्दिकला कर्णधार का बनवलं? रॉबिन उथप्पा म्हणाला, “रोहितची आकडेवारी…”