कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर सामना सुरू आहे. सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
कोलकाताकडून सलामीला सुनील नारायण आणि फिल सॉल्ट आले. मात्र खेळाला सुरुवात होण्यापूर्वीच विराट कोहलीनं अंपायरसोबत एक जबरदस्त प्रँक केला. मॅच सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीनं त्याची कॅप अंपायरला दिली आणि दाखवलं की तो गोलंदाजीसाठी पूर्णपणे तयार आहे. हे करण्याआधी कोहलीनं सुनील नारायणशीही चर्चा केली. खरं तर कोहली हे सगळं गंमतीत करत होता, कारण आरसीबीचं पहिलं षटक मोहम्मद सिराजनं टाकलं.
विराट कोहली अंपायरकडे जाण्यापूर्वी सुनील नारायणशी बोलायला गेला तेव्हा नारायण जोरजोरात हसायला लागला. या मजेशीर घटनेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. यूझर्स कोहलीच्या सेन्स ऑफ ह्युमरचं कौतुक करताना म्हणतायेत की तो नेहमी स्वतःभोवती चांगलं वातावरण ठेवतो. त्याचवेळी, कोहलीनं गोलंदाजी तर ते त्याच्या संघासाठी चांगलं होईल, असंही कोणीतरी म्हणतंय.
Virat Kohli gave his cap to Umpire, started warming up and had a chat to Narine as he was going to bowl. 😄👌 pic.twitter.com/x7tW5SaEEG
— Johns. (@CricCrazyJohns) April 21, 2024
Virat Kohli the captain on charge . pic.twitter.com/NAgbT4Pw3i
— Sohel. (@SohelVkf) April 21, 2024
Kohli justifies that quote of “There is nothing that Virat Kohli can’t do”..
He made Sunil Narine laugh lol pic.twitter.com/s5P7HvYRzL— S P Y (@Kohli_Spy) April 21, 2024
आयपीएल 2024 मध्ये विराट कोहली तुफान फार्मात आहे. कोलकाता नाऊट रायडर्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी त्यानं 7 सामन्यात 72.2 च्या उत्कृष्ट सरासरीनं 361 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो सध्या आघाडीवर आहे. विराट कोहलीला त्याच्या स्ट्राइक रेटवरून नेहमीच खूप ट्रोल केलं जातं, मात्र येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की किंग कोहली आयपीएल 2024 मध्ये 147 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं फलंदाजी करतोय. याशिवाय त्यानं या हंगामात आतापर्यंत 1 शतक आणि 2 अर्धशतक ठोकले आहेत.
विराट कोहली जरी या हंगामात चांगल्या फार्मात असला तरी आरसीबीसाठी अद्याप काहीही ठीक चाललेलं नाही. संघ 7 सामन्यांमध्ये 6 पराजय आणि केवळ एका विजयानंतर गुणतालिकेत तळाशी आहे. त्यांनी पंजाब किंग्ज विरुद्ध हा विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईनं रोहित शर्माला काढून हार्दिकला कर्णधार का बनवलं? रॉबिन उथप्पा म्हणाला, “रोहितची आकडेवारी…”