सोमवारी (११ ऑक्टोबर) झालेल्या एलिमीनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कोलकाता नाईट रायडर्सने धुव्वा उडवला. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा आरसीबीकडून शेवटचा सामना ठरला. या सामन्यानंतर बऱ्याच क्रिकेटच्या जाणकारांनी विराटबाबत आप-आपली मते मांडली आहेत. माँटी पानेसरनेही विराटबद्दल आपले मत व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू पानेसर म्हणाला, त्याने नुकतेच आरसीबीचे कर्णधारपद सोडले आहे. आता विराट संपूर्ण आयपीएलही सोडेल. विराटने आयपीएलमधून निवृत्ती घेतली, तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण कोहली असे का करेल असे विचारले असता पानेसरने याचे कारणही सांगितले आहे.
तो म्हणाला की, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार आयपीएल सोडू शकतो. यूएईमध्ये आयपीएल २०२१ चा दुसरा भाग सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने या हंगामानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. मात्र, पानेसरने विराट बाबत केलेले वक्तव्य हे एक खेळाडू म्हणून आहे.
आरसीबी आणि केकेआर यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यानंतर पानेसर विराट कोहलीबद्दल बोलला. तो म्हणाला, ‘जर विराट कोहलीने आयपीएलमधून निवृत्ती घेण्याचे जाहीर केले, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. त्याला अजून बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे आहे. त्याला भारतात २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची इच्छा असेल. त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, तो आयपीएल सोडण्याचे पाऊल उचलू शकतो.
विराट कोहलीने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी आरसीबीचा कर्णधार म्हणून आयपीएलमधील आपला शेवटचा सामना खेळला. त्याने हा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला. या सामन्यात कोलकाता संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा २ चेंडूंत ४ गडी राखून पराभव केला. सलग दुसऱ्यांदा आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचून अंतिम फेरी गाठता आली नाही.
विराट आयपीएलचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २०७ सामन्यांमध्ये ६२८३ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये ६००० हुन अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे. विराट कोहलीने एका मोसमात आयपीएलमध्ये सर्वाधिक ९७३ धावा करण्याचा विक्रम केलेला आहे. त्याने २०१६ मध्ये ४ शतकांसह हा पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचा भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश, पण बीसीसीआयला सतावतेय ‘ही’ चिंता
कहर कारनामा! उत्तम प्रदेशच्या वासु वत्सचा मोठा पराक्रम, हॅट्रिकसह घेतल्या तब्बल ८ विकेट्स