आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धातील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात खेळला गेला. कमालीच्या एकतर्फी झालेल्या या सामन्यात केकेआरने ९ गड्यांनी मोठा विजय संपादन केला. आरसीबीचा कर्णधार विराट कोहली याच्यासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण सामना होता. मात्र, स्वतः विराट आणि त्याचा संपूर्ण संघ या सामन्यात अपयशी ठरला. विशेष म्हणजे विराटने आपल्या कारकिर्दीतील दोन महत्त्वपूर्ण सामने याच केकेआर विरुद्ध खेळले आणि या दोन्ही सामन्यात आरसीबीला दोन लाजिरवाण्या पराभवांना सामोरे जावे लागले.
कारकीर्दीतील दोन महत्त्वाचे सामने खेळले केकेआर विरुद्ध
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराटने आज आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना खेळला. विशेष म्हणजे आपल्या आयपीएल कारकिर्दीतील दोन महत्वाचे सामने विराट केकेआर विरुद्धच खेळलाय. विराटने आपले आयपीएल पदार्पण आयपीएल इतिहासातील पहिल्या सामन्यातून केकेआर विरुद्धच केले होते.
आरसीबीला आपल्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव केकेआर विरुद्ध या पहिल्या सामन्यात पत्करावा लागला होता. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने आरसीबीला १४० धावांचा मोठ्या फरकाने पराभूत केलेले. हा आरसीबीच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे.
त्या बरोबरच आता विराटने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना देखील याच केकेआर विरूध्द खेळला. दुर्दैवी गोष्ट म्हणजे आरसीबीला सर्वाधिक चेंडू राखून पराभव स्वीकारण्याची नामुष्की याच सामन्यात आली. आरसीबीने दिलेले ९३ धावांचे आव्हान केकेआरने केवळ ६० चेंडूमध्ये पूर्ण केले. अशाप्रकारे हे दोन्ही संस्मरणीय सामने विराटसाठी लाभदायी ठरले नाहीत. विशेष म्हणजे हा सामना केकेआर संघाचाही २०० वा सामना ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडचा पाकिस्तानला ४४० व्होल्टचा झटका; जळफळाट झालेल्या अध्यक्षांचं खेळाडूंना भावनिक आवाहन
भोगा फळं…! न्यूझीलंडनंतर इंग्लंडचाही पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दणका; थेट दौराच रद्द