इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात एक वेळ पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. सलामीचे फलंदाज केएल राहुल (४६) आणि रोहित शर्मा (१२७) यांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची खेळी केली ज्यानंतर पुजाराने (६१) देखील रोहित शर्माची साथ देत दुसऱ्या विकेटसाठी दीडशतकी खेळी केली. यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आला. यादरम्यान रोहित शर्माने लगावल्या शतकाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
रोहितने दुसऱ्या डावात १२७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाला एका मजबूत स्थितीत आणले. भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि वीरेंद्र सेहवागने रोहितच्या या शानदार खेळीचे तोंडभरून कौतुक केले. रोहितचा स्वाभाविक खेळ हा आक्रमक स्वरूपाचा आहे. मात्र, या सामन्यात त्याने आपल्या शैलीत बदल करत संथ स्वरूपाने धावा करत नवनवीन विक्रम रचले. यामुळे त्याचे आता सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने शनिवारी (४ सप्टेंबर) एक ट्विट करत लिहिले, “एका उच्चश्रेणीच्या खेळाडूकडून, एक उच्च श्रेणीची खेळी. रोहित शर्माला प्रणाम. ती या मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळी ठरू शकते. चला एक मोठी आघाडी मिळवू.”
A top class innings from a high class player. Take a bow #RohitSharma .
Could well be a series defining innings.
Come on, let’s get a big lead. pic.twitter.com/2M48YepWO2— VVS Laxman (@VVSLaxman281) September 4, 2021
त्यानंतर भारताचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागने देखील रोहितच्या या शतकाबाबत कौतुक केले. यात सेहवाग म्हणाला, “शानदार, जबरदस्त जिंदाबाद. जर एखादी कठीण परिस्थिती आली, तर खूप अवघड होते. रोहित शर्माकडून त्याचे पहिले विदेशी कसोटी शतक, क्लास”
Shaandar Zabardast Zindabad.
When the going gets tough the tough get going. Outstanding first overseas Test hundred from #RohitSharma .
Class ! pic.twitter.com/aw3NYCuO5y— Virender Sehwag (@virendersehwag) September 4, 2021
दरम्यान, दुसऱ्या डावात ९९ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. चौथ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात सर्वबाद ४६६ धावा करत इंग्लंडला ३६८ धावांचे आव्हान दिले. भारताकडून रोहित आणि पुजारानंतर रिषभ पंत (५०) आणि शार्दुल ठाकूर (६०) यांनी देखील अर्धशतकी खेळी केली. इंग्लंजकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर चौथ्या दिवसाखेर इंग्लंडचे रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद या सलामीवीरांनी बिनबाद ७७ धावांची भागीदारी करत इंग्लंडला चांगली सुरुवात करुन दिली.
महत्त्वाच्या बातम्या –
–पंतने ‘हा’ विक्रम करत धोनी, किरमानी यांच्यासारख्या दिग्गज यष्टीरक्षांकांमध्ये मिळवले स्थान
–टी२० विश्वचषकासाठी ‘या’ ३ भारतीय खेळाडूंना लागू शकते लॉटरी; एकाकडे तर गोलंदाजीचा दांडगा अनुभव
–विराट मैदानात उतरला म्हणजे विक्रम ठरलेलाच! एकाच खेळीत दोन मोठे विक्रमांसह दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान