चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने शनिवारी (२ ऑक्टोबर) इंडियन प्रीमियर लीग २०२१ मध्ये आपले पहिले शतक झळकावले. त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध वादळी खेळी केली. अबूधाबीमध्ये झालेल्या या सामन्यात तो सामनावीरही ठरला. गायकवाडने सीएसकेच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आयपीएलमधील आपले पहिले शतक साजरे केले त्याने ६० चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या.
चोवीस वर्षीय ऋतुराज या हंगामात ५०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलकडून ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. सीएसकेच्या सलामीवीराने उत्कृष्ट खेळी करत डावात फक्त १४ डॉट बॉल खेळले. त्याच्या या खेळीमुळे, त्याच्यावर क्रिकेट जगतातून कौतुक आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
वीरेंद्र सेहवागने ऋतुराजसाठी खास ट्वीट केले. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘नाव लक्षात ठेवा, ऋतुराज गायकवाड. खास खेळाडू, महान गोष्टींसाठी बनलेले असतात. ही जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवण्यापूर्वीची वेळ आहे.’
Remember the name.#RuturajGaikwad.
Special player, made for greater things. Matter of time before he dominates World Cricket. #CSKvsRR pic.twitter.com/XPp69w9tgE— Virender Sehwag (@virendersehwag) October 2, 2021
मोहम्मद कैफ म्हणाला, “ऋतुराज दाखवून दिले की, तुमचा गेम न बदलता तुमचा आत्मविश्वास तुम्हाला गेम चेंजर बनवू शकतो.’
Ruturaj shows that self belief can make you a game-changer without changing your game. 💯👏👏👏 @Ruutu1331 #CSKvsRR
— Mohammad Kaif (@MohammadKaif) October 2, 2021
इरफान पठाणने ट्विट केले की, ‘वाह फक्त वाह.’
Wow just wow. #RuturajGaikwad 💯
— Irfan Pathan (@IrfanPathan) October 2, 2021
ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या एका हंगामात ५०० धावांचा टप्पा पार करणारा चेन्नई सुपर किंग्सचा सातवा फलंदाज ठरला आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सुरेश रैनाने ३ वेळा आयपीएलमध्ये हा पराक्रम केला आहे.
या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने दमदार शतक झळकावले आणि निर्धारित २० षटकात १८९ धावा केल्या. प्रतिउत्तरादाखल, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अर्धशतकीय खेळींच्या जोरावर राजस्थाने ७ गडी आणि १५ चेंडू राखून चेन्नईने दिलेलं आव्हान पार केले.
महत्त्वाच्या बातम्या –
कमनशिबी जोडी नं.१! तब्बल ‘इतक्या’ वेळा संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत राहुल-मयंक
काय सांगता? आरसीबीसाठी युझवेंद्र चहलला करायची आहे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी, पाहा व्हिडिओ
“टेस्ट चॅम्पियनशीप फायनलपेक्षाही भारताला त्यांच्या घरात पराभूत करणे मोठे आव्हान”