जगातील सर्वात महान गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या वसीम अक्रमने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर श्रीलंकाचा माजी फलंदाज रोशन महानामाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. वसीमने व्हिडिओ शेअर करत जे लिहिले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर तो व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.
वसीमने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर तो व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, ‘रोशन आजोबा बनणार आहे.’ त्याखाली मला माफ कर रोशन, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात असे हॅशटॅग दिले आहेत.
हा व्हिडिओ १९८९-९० साली विश्वमालिकेदरम्यान श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या सामन्याचा आहे. हा सामना चालू असताना वसीमचा चेंडू रोशनच्या प्रायवेट पार्टला लागला आणि त्याला दुखापत झाली. तरीही रोशनने त्याच्या दुखापतीवर दुर्लक्ष करत पुन्हा फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण, पुन्हा वसीमचा चेंडू त्याच ठिकाणी जाऊन लागला आणि रोशन दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्यानंतर रोशनला त्याच्या संघसहकाऱ्याच्या मदतीने मैदानाबाहेर नेण्यात आले. Wasim Akram Hit Roshan Mahanama Private Part Two Times
And Roshan went on to be a grandfather…. #ImSoSorryRoshan #Cricket #TheseThingsHappen pic.twitter.com/fidBQKJo1j
— Wasim Akram (@wasimakramlive) August 3, 2020
वसीमने हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी मजेत कमेंट केली आहे. जोन्सनी त्यावेळी गंभीरतेला लक्षात न घेता म्हटले की, “तो (रोशन) तुला (वसीमला) बॅटने खेळण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीने खेळत होता.” जोन्सनी जरी ही कमेंट मजेत केली असली तरी यामुळे मोठा वाद होऊ शकतो.
श्रीलंकाने पाकिस्तानविरुद्धचा तो सामना ३ विकेट्सने जिंकला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकाला २२३ धावांचे आव्हान दिले होते. श्रीलंकाने ४५.३ षटकात ७ विकेट्स गमावत लक्ष्य पूर्ण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा
गेल्या ४ वर्षात अशी अफलातून कामगिरी करणारा शान मसूद पहिलाच सलामीवीर
सुंदरतेचं उदाहरण म्हणजे टीम इंडियाची ‘ही’ महिला क्रिकेटपटू; बॉलिवुड अभिनेत्रीही पडतील फिक्या…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज
४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप