आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलने या हंगामातील पहिल्या टप्प्यात खेळलेल्या सात सामन्यांमध्ये ६६ च्या सरासरीने ३३१ धावा केल्या आहेत. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर कायम आहे. अशात, भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभारने अशा व्यक्त केली आहे की, भारतासाठी वरच्या फळीत फलंदाजी करणारा केएल राहुल आयपीएलच्या उर्वरीत सामन्यातही चांगले प्रदर्शन करेल.
गंभीरने स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लॅन या कार्यक्रमात म्हटले आहे की, “आपण आतापर्यंत केएल राहुलचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन पाहिले नाही. त्यानी धावा केल्या आहेत, पण आपण हे नाही पाहिले की, तो फलंदाजीमध्ये काय सध्या करू शकतो. तो एक असा हंगाम खेळू शकतो, जसा विराट कोहलीने खेळले होते. तो मर्यादित षटकांमधील असा क्रिकेटपटू आहे, जो एका हंगामात चांगल्या स्ट्राइक रेट सह दोन तीन शतक करू शकतो.”
मुंबई इंडियन्स संघविषयी बोलताना गंभीर म्हणाला की, यूएई चे वातावरण गतवर्षीच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी अनुकूल आहे. उर्वरित समन्यांमधील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये होणार आहे.
याविषयी बोलताना गंभीर म्हणाला, “चेपॉक किंवा दिल्लीचे वातावरण पाहिले तर वानखेडेपेक्षा वेगळे आहे. मला वाटते की, तेथील परिस्थिती मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसाठी आणि ट्रेंट बोल्टसाठी अनुकूल असेल. त्यांना स्विंग भेटेल आणि ते धोकादायक ठरतील.”
आरसीबी आणि त्यांचा कर्णधार विराट कोहलीविषयी बोलताना तो म्हणाला, “विराटसाठी हे एक विगळेच आव्हान आहे. कारण पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळानंतर लगेच टी२० प्रकारात खेळायचे आहे. त्याला मध्ये वेळच नाही मिळाला. आरसीबीला प्लेॲफमध्ये क्वालिफाय करायचा असेल, तर विराट आणि एबी डिव्हिलियर्स यांना धावा कराव्या लागतील.”
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात कोहली ‘या’ बाबतीत अव्वल स्थानी; ख्रिस गेलसारख्या फलंदाजालाही टाकले मागे
हेडन बनला पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक तर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लागली ‘या’ दिग्गजाची वर्णी
भारीच! आयसीसीने ‘त्या’ कुत्र्याला दिला खास ‘डॉग ऑफ द मंथ’ पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण