भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम वनडे सामना आज (२३ जुलै) खेळला जाणार आहे.या मालिकेत भारतीय संघाने २-० ची विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या वनडे सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येऊ शकते. तसेच हा सामना जिंकून भारतीय संघाकडे क्लीन स्वीप करण्याची संधी असणार आहे. परंतु, या सामन्यात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Weather report of 3rd odi between India vs srilanka)
कसे असेल तिसऱ्या वनडे सामन्यात वातावरण
भारतीय वेळेनुसार,भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना दुपारी ३ वाजता प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तसेच अडीच वाजता नाणेफेक केले जाईल. या सामन्यात पाऊस श्रीलंका संघाचा क्लीन स्वीप होण्यापासून बचाव करू शकतो.
आज कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ८०% असणार आहे. तर रात्री पाऊस पडण्याची शक्यता ९०% असणार आहे. दिवसा आद्रता ८१ टक्के राहील तर रात्री ही आद्रता ८९ टक्क्यांपर्यंत पोहचेल. तसेच हवेचा ताशी वेग १५ ते २५ किमी प्रति तास असेल. जर तापमानाबद्दल बोलायचं झालं तर,कोलंबोमध्ये कमाल तापमान २९ अंशांपर्यंत जाऊ शकते, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील.
युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
ही मालिका भारतीय संघाने आपल्या नावावर केली आहे. त्यामूळे तिसऱ्या वनडे सामन्यात,काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ ऐवजी देवदत्त पडिक्कल किंवा ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात येऊ शकते. तसेच यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनऐवजी संजू सॅमसनला पदार्पण करण्याची संधी देण्यात येऊ शकते.
असा आहे भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर, दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.
असा आहे श्रीलंका संघ
दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसंका, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रेमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: बुद्धिबळ खेळायला पैसे नसल्याने क्रिकेटर झालेला भारताचा स्टार खेळाडू ‘युजवेंद्र चहल’
क्रिकेटचे ‘द्रोणाचार्य’ रमाकांत आचरेकरांबद्दल ‘या’ ५ गोष्टी माहित आहेत का?