वय फक्त एक आकडा आहे, हे वाक्य अनेकांनी सिद्ध करुन दाखवले आहे. आता हे वाक्य एका 83 वर्षांच्या आजींनाही तंतोतंत लागू होते. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक आजी वेटलिफ्टींग करताना दिसत आहेत. त्यांचा फिटनेस पाहून अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील आजीचे वय 83 असून त्यांचे नाव किरण बाई असे आहे. या व्हिडिओमध्ये आजी साडीवर वेटलिफ्ट करताना दिसून येत आहे. किरण बाईंचा हा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर त्यांच्या नातवाने शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. किरण या चेन्नई येथील रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासूनच खो-खो आणि कबड्डी यांसारख्या खेळात रस होता.
वय वर्ष 83 असतानाही त्या खूप तंदुरुस्त आहेत. वेटलिफ्टर बनवण्याचा प्रवास मागील एक वर्षापूर्वी झालेल्या अपघातानंतर सुरू झाला. मागील वर्षी पडल्यानंतर त्यांना पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना नीट चालताना त्रास होत होता. त्यांना भीती वाटत होती की त्यांना नीट चालता येईल की नाही.
https://www.instagram.com/p/CL_6zumj7oW/
द न्यू इंडियन एक्सप्रेसला बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या नातू एक जिम ट्रेनर आहे. त्यांच्या नातवानेच त्यांना पूर्ण बरं करायची जबाबदारी घेतली होती आणि पूर्ण घराला त्याने जिममध्ये रुपांतर केले. नातवाने आपल्या आजीसाठी व्यायामाची योजना बनवली.
त्या दिवसानंतर त्यांनी कधीच मागे फिरून बघितला नाही. त्या एका आठवड्यातून 3 वेळा वेट उचलतात. त्या सुरुवातीला व्यायाम करतात. त्यांच्या या वर्षीच्या 83 वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या नातवाने त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या 25 किलो ग्रॅम वजन उचलताना दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
केशव महाराजची कमाल! हॅट्रिकसह ६१ वर्षानंतर बनला ‘अशी’ कामगिरी करणारा दुसरा गोलंदाज
घरोघरी जावुन पाकिस्तानी क्रिकेटर वाटतोय टुव्हिलर, पाहा काय आहे कारण