भारत आतापर्यंत फक्त 2017 मध्ये झालेल्या17 वर्षाखालील फिफा विश्वचषकात खेळला. फिफामध्ये खेळण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती.
भारत फिफा विश्वचषकात जागा मिळवण्यासाठी खूप वर्षापासून प्रयत्न करत आहे. 1950 ला ही संधी मिळाली होती. मात्र भारतीय संघाने हा सामना खेळला नाही.
कारण भारतीय खेळाडूंना ही ब्राझिलमधील स्पर्धा अनवाणी पायाने खेळायची होती. मात्र त्यांना मनाई केली होती. अशी ही या मागची गोष्ट आपण नेहमीच ऐकत आलो आहे. परंतु ही गोष्ट हि खोटी आहे.
यजमान देश ब्राझिलने भारतीय संघाला हा विश्वचषक खेळण्यासाठी प्रवास करायला सांगितला.
याला ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (एआयएफएफ)ने विरोध दर्शविला. कारण त्यावेळी भारतासाठी चौथ्या फिफा विश्वचषकापेक्षा ऑलिंपिकची स्पर्धा महत्वाची होती.
ब्राझिल प्रवासाचा खर्च करण्यासही तयार होता. परंतु एआयएफएफला संघाने अर्ध्या जगाचा एवढा प्रवास जहाजातून करणे ही बाब पटत नव्हती.
तुर्कीचा संघही भारताप्रमाणेच या विश्वचषकात प्रवासाच्या अंतराने सहभागी झाला नाही. युरोपमधील स्कॉटलंड, आयरलॅंड, पोर्तुगल आणि फ्रांस यांनीही ही या स्पर्धेत भाग घेतला नाही.
तसेच एआयएफएफला खेळाडूंच्या फिटनेसचीही काळजी होती. त्यावेळी भारतीय खेळाडू फक्त 70 मिनीटांचे सामने खेळत असतं. मात्र विश्वचषकातील सामने 90 मिनीटांचे होतात.
या छोट्या स्पर्धेला पाठवून खेळाडूचा अपमान करायचा नव्हता- एआयएफएफ
भारताच्या शेजारील देशांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने भारताला खेळण्यास बोलावले होते.
भारताची अनवाणी पायाने खेळण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. ते याआधीही असे खेळले आहे.
1948च्या ऑलिंपिकमध्ये भारत अनवाणी पायाने किंवा फक्त मोजे घालून खेळला आहे.
या स्पर्धेतील पहिल्या फेरीत भारताने फ्रांसला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. पण 86 व्या मिनीटाला फ्रांसला गोल करण्याची संधी मिळाली.
भारताच्या या कामगिरीवर खूष होत किंग जॉर्ज सहावा याने प्रशिक्षक सईद अब्दूल रहीम यांना बकिंघम पॅलेसमध्ये बोलावले.
त्यावेळी ब्रिटीश मिडीया भारतीय संघातील फॉरवर्ड अहमद खान यांना त्याच्या चेडूंवरील अप्रतिम नियंत्रणामुळे ‘स्नेक चार्मर’ या नावाने ओळखत होते.
पण 1952च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारताला अनवाणी पायाने खेळणे अवघड जाऊ लागले. फिनलॅंडमधील थंड वातावरण हे त्याला कारणीभूत होते.
येथे भारत युगोस्लाव्हियाकडून 1-10 अशा मोठ्या फरकाने पराभूत झाला. या पराभवानंतर एआयएफएफने खेळाडूंना शूज घालण्याची सक्ती करण्यात आली.