हंगेरीच्या बुडापेस्ट येथे आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्यांनी ५ सुवर्ण पदकांसह १३ पदके आपल्या नावावर केली आहेत. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अविश्वसनीय कामगिरीसाठी त्यांचे अभिनंदन केले आहे. या चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने ७३ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारूसची कुस्तीपटू सेनिया पट्टापोविचला ५-० ने पराभूत करत सुवर्ण पदकाची कमाई केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाचे अभिनंदन करत म्हटले की, “हंगेरीच्या बुडापेस्ट येथे भारताने जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये ५ सुवर्ण पदकांसह १३ पदकांची कमाई केली आहे. त्यासाठी आमच्या संघाचे अभिनंदन आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.” (World Cadet Championship India Wins 13 Medals Including 5 Gold At World Cadet Championship PM Modi Congrats Them)
Our sportspersons continue to make us proud. India wins 13 medals, including 5 Golds at the World Cadet Championships in Budapest, Hungary. Congratulations to our team and best wishes for their future endeavours. pic.twitter.com/3HlOrKTtDB
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2021
भारताने स्पर्धेत ५ सुवर्ण पदकांसह जिंकले १३ पदके
जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये गेलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेत ५ सुवर्ण पदकांसह १३ पदकांवर आपले नाव कोरले आहे. प्रिया मलिकव्यतिरिक्त युवा कुस्तीपटू तनुनेही जागतिक कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. तिने ४३ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात बेलारूसच्या वेलेरिया मिकित्सिचला पराभूत करत किताब आपल्या नावावर केला.
त्याचबरोबर १६ वर्षीय कोमल पांचाळनेही जागतिक कॅडट कुस्ती स्पर्धेत ४६ किलो वजनी गटात सुवर्ण पदक आपल्या नावावर केले. कोमलने अजरबैजानच्या खेळाडूला अंतिम सामन्यात ७-२ ने पराभूत करत हे पदक जिंकले. याव्यतिरिक्त इतर दोन महिला कुस्तीपटू वर्षा (६५ किलो वजनी गट) आणि अंतिम (५३ किलो वजनी गट) ने कांस्य पदक जिंकले. या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघ महिलांच्या गटात एकूण दुसऱ्या स्थानी राहिला. अमेरिका संघ पहिल्या, तर रशियाचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला.
पुरुषांमध्ये अमन आणि जगलान यांनी पटकावले चॅम्पियनशिपचा किताब
यापूर्वी ४८ किलो वजनी गटात अमन गुलिया आणि ८० किलो वजनी गटात सागर जगलानने पुरुषांच्या फ्रीस्टाइल स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये त्यांनी विजय मिळवून भारतीय संघाला इतिहासात पहिल्यांदाच चॅम्पियनशिपचे किताब जिंकून दिले होते.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ