नुकताच ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (australia vs england) या दोन्ही संघांमध्ये ऍशेस मालिकेचा (Ashes series) थरार पार पडला. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने १४६ धावांनी विजय मिळवला. यासह त्यांनी या मालिकेत ४-० ने विजय मिळवला आहे. दरम्यान या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाला मोठा फायदा झाला आहे.
इंग्लंड संघाविरुद्ध अप्रतिम कामगिरी करणाऱ्या पॅट कमिन्सच्या (pat Cummins) संघाला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. हा संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (World test championship points table) गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी कायम आहे. तर इंग्लंड संघाचे या पराभवाने मोठे नुकसान झाले आहे. हा संघ गुणतालिकेत सर्वात खाली ९ व्या स्थानी पोहोचला आहे.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संघाचे ५२ गुण आहेत. तसेच विजयाची सरासरी एकूण ८६.६६ इतकी आहे. तर इंग्लंड संघ या गुणतालिकेत १० गुण आणि ९.२५ विजयाच्या सरासरीने ९ व्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंका संघ २४ गुण आणि १०० टक्के विजयाच्या सरासरी सह सर्वोच्च स्थानी विराजमान आहे. तसेच पाकिस्तान संघ ७५ टक्के विजयाच्या सरासरीसह तिसऱ्या स्थानी आहे.
तर नुकताच झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत विजय मिळवल्याचा दक्षिण आफ्रिका संघाला मोठा फायदा झाला आहे. हा संघ ६६.६६ टक्के विजयाच्या सरासरीसह चौथ्या स्थानी आहे. तर भारतीय संघ ४९.०७ टक्के विजयाच्या सरासरीसह ५ व्या स्थानी आहे.
Here's how the #WTC23 table stacks up after Australia clinched a 4-0 series victory in the #Ashes 🔢 pic.twitter.com/a0oaus1KoM
— ICC (@ICC) January 16, 2022
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने ३०३ धावांचा डोंगर उभारला होता. तर प्रत्युत्तरात इंग्लंड संघाला १८८ धावा करण्यात यश आले होते. यासह ऑस्ट्रेलिया संघाला मोठी आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघाने १५५ धावा केल्या होत्या. यासह इंग्लंड संघाला विजयासाठी २७१ धावांची आवश्यकता होती. परंतु इंग्लंड संघाला अवघ्या १२४ धावा करण्यात यश आले होते.
महत्वाच्या बातम्या :
विराटच्या राजीनाम्यानंतर तापले राजकारण! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जय शहांना टोला
हे नक्की पाहा: