भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताला एकमात्र कसोटी सामना, तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. आता या कसोटी सामन्याच्याविषयी मोठी बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या सामन्यात भारताचे नेतृत्व करणार आहे. तर रिषभ पंतला उपकर्णधार बनवले गेले आहे.
काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा कोरोना पॉजिटिव्ह आढळला होता. अशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी रोहितच्या उपस्थितीविषयी संभ्रम होता. गुरुवारी (३० जून) बीसीसीआयने याविषयी अधिकृत माहिती दिली. जसप्रीत बुमराह पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करणार आहे. युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत भारताचे नेतृत्व करत होता. अशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला उपकर्णधारपद सोपवले गेले आहे.
भारतीय संघात २०२१ पासून अनेक फेरबदल झाले आहेत. यादरम्यान संघाला तब्बल ६ कर्णधार मिळाले असून जसप्रीत बुमराह २०२१ पासूनचा भारताचा ७ वा कर्णधार बनले. यादरम्यान रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, शिखर धनव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या या ६ कर्णधारांच्या नेतृत्वात संघ खेळला आहे.
NEWS 🚨 – @Jaspritbumrah93 to lead #TeamIndia in the fifth Test Match against England.@RishabhPant17 will be the vice-captain for the match.#ENGvIND pic.twitter.com/ueWXfOMz1L
— BCCI (@BCCI) June 30, 2022
भारतीय क्रिकेटमध्ये शक्यतो खूप कमी वेळा वेगवान गोलंदाजांना संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. दिग्गज कपिल देव (kapil Dev) याला अपवाद ठरतात. कपिलने १९८७ मध्ये कर्णधाराच्या रूपात भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तब्बल ३५ वर्ष झाले, पण एकाही वेगवान गोलंदाजाने भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व केले नाहीये. इंग्लंडविरुद्ध १ जुलैपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात मात्र जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ही परंपरा मोडू शकतो.
दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल कर्णधारपदासाठी चांगला पर्याय होता, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी केएल राहुलला दुखापत झाली आणि तो सध्या जर्मनीमध्ये त्यावर उपचार घेत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन फिरकीपटूनेच अखेर केली शेन वॉर्नची बरोबरी, वाचा काय आहे अनोखा विक्रम
‘जेव्हा स्मिथच्या अंगात स्टार्क संचारतो’, पाहा व्हायरल होणार भन्नाट व्हिडिओ
भारतासाठी धोक्याची घंटा! बहुप्रतिक्षित पाचव्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर