पुणे- महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना(एमसीए) यांच्या वतीने आयोजित व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली होत असलेल्या पहिल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ एलो2000पेक्षा अधिक रेटिंग खेळाडूंसाठीच्या स्पर्धेत अग्रमानांकित फारूख अमोनातोव्हने अत्यंत चुरशीच्या लढतीत बोरिस सावचेन्कोवर निर्णायक विजय मिळविताना येथे सुरू असलेल्या पहिल्या महाराष्ट्र ओपन आंतरराष्ट्रीय ग्रॅन्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीअखेर एकट्याने अग्रस्थानावर झेप घेतली.
श्रीशिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत आता अखेरच्या दोन फेर्या बाकी असताना चुरस रंगली असली, तरी विजेतेपदासाठी अमोनातोव्हची दावेदारी सर्वात प्रबळ आहे. दीप सेनगुप्ता, अर्जुन कल्याण आणि अलेक्सिस अलोक्झांड्रोव्ह या ग्रॅन्डमास्टर र्देाच्या खेळाडूंनी आपापल्या लढतीत चमकदार विजयांची नोंद करताना प्रत्येकी 7.0 गुणांसह संयुक्त दुसर्या स्थानाची निश्चिती केली. लुका पैचाझ, श्रीहरी मित्तल, एलआर श्रीहरी, बोरिस चॅव्हचेन्को, नीलेश साहा, किरिल स्टुपॅक आणि मिहाईल निकिटेन्को या खेळाडूंनी प्रत्येकी 6.5 गुणांची नोंद करताना संयुक्त तिसरे स्थान राखले.
पुण्याच्या केवळ 15 वर्षीय आदित्य सामंतने एलआर श्रीहरीला चुरशीच्या सामन्यात बरोबरीत रोखताना आंतरराष्ट्रीय मास्टर किताबाचा तिसरा नॉर्म पूर्ण करून पुणेकरांमध्ये जल्लोेषाचे वातावरण निर्माण केले. आदित्यचे आता 6.0 गुण झाले आहेत. त्याने 2400 एलो गुणांचा टप्पाही पार केला आहे. मंगलोरच्या 21 वर्षीय शरण रावने एनग्युएन व्हॅन हुए याला रेटी ओपनिंगनंतर 31 चालींत बरोबरीत रोखताना दुसर्या आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्मची कमाई केली. महत्त्वपूर्ण एलो गुणांची कमाई करण्यासाठी ही स्पर्धा उत्तम असल्याचे शरणने सांगितले.
त्याआधी ग्रॅन्डमास्टर निकिटेन्कोने सेनगुप्ताविरुद्ध कारो कान बचावाचा अवलंब करीत झकास प्रारंभ केला. परंतु सेनगुप्ताने राजाच्या बाजूने आक्रमण करताना उंच व घोड्याची अदलाबदली करीत आगेकूच केली. निकिटेन्कोचा वजीर व अन्य मोहरी दुसर्या बाजूला अडकल्याने त्याची कोंडी झाली. सेनगुप्ताने 30व्या चालीला वजीर, हत्ती व उंटाच्या साहाय्याने निकिटेन्कोची कोंडी करीत विजयाची निश्चिती केली.
आणखी एका लढतीत द्वितीय मानांकित ग्रॅन्डमास्टर लुका पैचाझविरुद्ध अव्वल महिला खेळाडू दिव्या देशमुखला पराभव पत्करावा लागला. पैचाझनेही कारो कान बचावाचा अवलंब करीत आक्रमण केले. दोघांचेही राजे पटाच्या मध्यावर असताना दिव्याने कोंडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु पैचाझने वजीर व उंटाच्या साहाय्याने दिव्याचा हतीत मारला आणि मग राजाची कोंडी करीत 35व्या चालीत विजयाची पूर्तता केली.
निकाल: नववी फेरी: व्हाईट व ब्लॅक या नुसार:
जीएम फारूख अमोनोतोव्ह(ताजिकिस्तान)(7.5गुण)वि.वि.जीएम सावचेन्को बोरिस (रशिया)(6.5गुण)
जीएम दीप सेनगुप्ता (भारत) (7गुण)वि.वि.जीएम निकितेन्को मिहेल(बेलारूस)(6.5गुण);
जीएम गुयेन ड्यूक होआ(व्हिएतनाम) (6गुण)पराभूत वि.जीएम अलेक्झांड्रोव्ह अलेक्सेज (बेलारूस)(7गुण)
आयएम नीलश शहा(भारत)(6.5गुण)बरोबरी वि.आयएम आदित्य मित्तल (भारत)(6.5गुण)
जीएम कार्तिक वेंकटरामन(भारत)(6गुण)पराभूत वि.जीएम अर्जुन कल्याण (भारत)(7गुण);
डब्लूजीएम दिव्या देशमुख(भारत) (5.5गुण)पराभूत वि. जीएम पैचाझ लुका(जॅर्जिया)(6.5गुण);
जीएम ललित बाबू एम.आर(भारत)(6गुण)बरोबरी वि.सीएम कुशाग्र मोहन(भारत)(6गुण);
आयएम अनुज श्रीवत्री(भारत)(6गुण)बरोबरी वि.जीएम वेंकटेश एमआर(भारत)(6गुण);
जीएम स्तूपक किरील(बेलारूस) (6.5गुण)वि.वि.आयएम विक्रमादित्य कुलकर्णी(भारत)(5.5गुण);
जीएम विष्णू प्रसन्ना(भारत) (5.5गुण)पराभूत वि.आयएम श्रीहरी एल.आर(भारत)(6.5गुण);
श्रीहरी एल(भारत)(6गुण)बरोबरी वि.एफएम आदित्य सामंत(भारत)(6गुण).
एफएम शरण राव(भारत)(5.5गुण)बरोबरी वि.आयएम एनग्युएन व्हॅन हुए(5.5गुण);
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तुरुंगवासात असलेल्या नवज्योत सिंग सिद्धूंची बिघडली तब्येत, रुग्णालयात करण्यात आले भरती
पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावल्याचा आनंद अनावर, श्रीलंकन कर्णधाराचे ‘आक्रमक’ सेलिब्रेशन चर्चेत
रियान परागने हर्षल पटेलसोबतच्या वादाची सांगितली ईनसाईड स्टोरी, बघा काय म्हणाला तो?