मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेचे माजी सलामीवीर, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने मायदेशात 28 वर्षांनंतर आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. भारताला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.
भारतीय संघाच्या या विजयाचे श्रेय गॅरी कर्स्टन यांनी संघाचे मेंटल कंडीशनिंग कोच पॅडी अॅपटन यांना दिला आहे .
ग्रेग चॅपल हे भारतीय संघाचे प्रशिक्षक झाल्यानंतर बरीच वर्षे भारतीय संघ मानसिक अस्वस्थेत होता. सर्वच खेळाडू प्रचंड तणावामध्ये होते. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास कमी झाला होता. त्यावेळी कॅप्टन यांनी खेळाडूंचे ड्रेसिंग रूममध्ये आपल्या विचाराद्वारे मतपरिवर्तन करण्यात यशस्वी झाले.
भारतात क्रिकेटला धर्म इतकेच महत्त्व होते. या खेळाडूंवर फॅन्संचे देखील अतिरिक्त दबाव असतो. अनेक खेळाडू या मानसिक दबावात खेळ खेळत होते. पॅडी अॅपटन यांनी भारतीय संघाची सूत्रे सांभाळल्यानंतर हा तणाव दूर करण्यासाठी खेळाडूंची वेळोवेळी मदत केली असेही गॅरी कर्स्टन म्हणाले.
गॅरी कर्स्टन यांच्यानंतर प्रशिक्षकपदाची संपूर्ण सूत्रे झिम्बाब्वेचे क्रिकेट डंकन फ्लेचर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली पण ते प्रशिक्षक म्हणून यशस्वी होऊ शकले नाही.