काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणामुळे चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) फलंदाज सुरेश रैना हा भारतात परतला आहे. त्यामुळे तो यंदा आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळताना न दिसण्याची शक्यता आहे. अशात, संघात रैनाची जागा कोणता खेळाडू घेईल, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. अशात भारताचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राने त्या ५ खेळाडूंची निवड केली आहे, जे रैनाची जागा घेऊ शकतात. Aakash Chopra Picked 5 Players Who Can Replace Suresh Raina
चोप्राने सर्वप्रथम अष्टपैलू खेळाडू युसूफ पठानची निवड केली, जो आतापर्यंत आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद संघाकडून खेळला आहे.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रा म्हणाला की, “ते ५ खेळाडू कोण असू शकतात, जे सीएसकेमध्ये रैनाची जागा घेऊ शकतील. युसूफ हा खूप दमदार खेळाडू ठरू शकतो. कारण तुमच्याकडे वरच्या फळीत खेळण्यासाठी अनेक दमदार फलंदाज उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला कदाचित एमएस धोनीसोबत एका चांगल्या फिनिशरची गरज भासेल आणि युसूफ त्या रोलसाठी योग्य खेळाडू आहे.”
चोप्राने दुसरा पर्याय म्हणून मनोज तिवारीची निवड केली. तिवारीविषयी बोलताना चोप्रा म्हणाला की, “तिवारीची आयपीएल कारकीर्द जरी जास्त चांगली राहिली नसली. तरी त्याने अनेक शानदार खेळी केल्या आहेत. रायझिंग पुणे सुरजायंट्सकडून खेळताना त्याने काही चेंडूंचा सामना करत संघासाठी उपयोगी धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही तो अजूनही चांगल्या धावा करत आहे.”
तसेच, पुढे हनुमा विहारीची निवड करत चोप्राने आश्चर्य व्यक्त केले की, त्याला कोणत्याही संघाने का निवडले नाही.
“मी चकित झालो आहे की, विहारीसाठी कुणीही बोली लावली नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल की तो फक्त कसोटी क्रिकेटचा दमदार खेळाडू आहे, तर हे चुकीचे आहे. सीएसकेसोबतच प्रत्येक संघाला स्पिन चेंडूंचा सामना करणाऱ्या फलंदाजाची गरज असते. जर तुम्हाला असा कोणता खेळाडू मिळत असेल, जो स्पिन चेंडू उत्तम रीतीने खेळत असेल आणि सोबतच काही षटकांमध्ये गोलंदाजीही करत असेल, तर तो तुमच्यासाठी उत्कृष्ट पर्याय ठरु शकतो. विहारी हा माझी वैयक्तिक निवड आहे,” असेही पुढे चोप्रा म्हणाला.
शेवटी चोप्राने ध्रुव शोरेची निवड केली, ज्याने सीएसकेकडून २ सामने खेळले होते. दरम्यान त्याने काही दमदार झेलही झेलले होते तसेच चोप्राने चेतेश्वर पुजाराचीही निवड केली. “मी पुजाराला निवडत आहे, कारण तो स्पिन चेंडू खूप उत्तमरीत्या खेळतो. असे असले तरी, तो क्षेत्ररक्षणात तेवढा चांगला नाही आणि तो फिनिशर पण नाही,” असे पुढे बोलताना चोप्राने सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
-आयपीएल २०२०मधून माघार घेतलेल्या मलिंगाने केलाय ‘हा’ मोठा विक्रम, सीएसकेच्या एका खेळाडूचाही समावेश
-टेनिसपटू सुमीत नागलने रचला इतिहास; गेल्या ७ वर्षात ‘असा’ पराक्रम करणारा बनला पहिलाच भारतीय
-सौरव गांगुलीला कठिण काळात प्रणव मुखर्जींनी दिले होते समर्थन; म्हणाले होते…
ट्रेंडिंग लेख –
-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप
-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट
-आयपीएल २०२०: युएईतील मैदान गाजवणार हे ५ गोलंदाज, फलंदाजांची करणार दांडी गुल