काल (२८ जुलै) आयसीसीने वनडे क्रमवारी यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने बाजी मारली आहे. तो आयसीसीच्या वनडे फलंदाजी क्रमवारीत ८७१ गुणांसह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर, भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हा ८५५ गुणांसह दूसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा नवनियुक्त कर्णधार बाबर आझमने (८२९ गुण) या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.
गोलंदाजांच्या वनडे क्रमवारी यादीत न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने (७२२ गुण) अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर, भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ७१९ गुणांसह दूसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तसेच, अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान हा ७०१ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या यादीत टॉप-१० मध्ये रविंद्र जडेजा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो २४६ गुणांसह ८व्या स्थानावर आहे. तर, पहिल्या स्थानावर अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबी (३०१) आणि दूसऱ्या स्थानावर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स (२९३) आहे.
इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज जेसन रॉय आणि यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो हे आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे फलंदाजी क्रमवारी यादीत अनुक्रमे ११व्या आणि १४व्या क्रमांकावर आहेत.
उद्यापासून (३० जुलै) इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात सुरु होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत या दोघांना चांगली संधी आहे. रॉय आणि बेयरस्टो फलंदाजी क्रमवारीत पहिल्या १०मध्ये येण्याच्या प्रयत्नात असतील. तसेच, इंग्लंडचा विश्वविजेता कर्णधार इयॉन मॉर्गन हा तब्बल २३व्या क्रमांकावर गेला आहे.
नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेतील खेळाडूंना इंग्लंडच्या वनडे संघात सामाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे वनडे संघातील गोलंदाजीची धुरा इंग्लंडचा गोलंदाज आदिल राशिद (२९ क्रमांक) आणि उपकर्णधार मोईन अली (४४ क्रमांक) यांना सांभाळावी लागणार आहे.
आयर्लंड संघाविषयी पाहायचे झाले तर, कर्णधार अँड्र्यू बालबर्नी हा वनडे फलंदाजी क्रमवारी यादीत ४६व्या स्थानावर आहे. तर, पॉल स्टर्लिंग हा २७व्या स्थानावर आहे. फिरकीपटू गोलंदाज एंडी मैक्ब्रिन हा गोलंदाजांच्या क्रमवारी यादीत ३१व्या स्थानावर आहे. तर, वेगवान गोलंदाज बॉयड रैंकिंन हा संयुक्तपणे ४०व्या स्थानावर आहे.
बहुप्रतिक्षित आयसीसी सुपर लीगची सुरुवात इंग्लंड-आयर्लंड मालिकेपासून होणार आहे, ज्यामध्ये १३ संघ २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी पुरूष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थेट पात्र होण्यासाठी खेळतील.
महत्त्वाच्या बातम्या –
एक चुकी वेस्ट इंडिजला भोवली, तर अन्य ५ खास कारनामेही या कसोटीत पहायला मिळाले
५०० विकेट्स घेणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने निवृत्तीबद्दल केले मोठे भाष्य, म्हणतो अजून काही…
…म्हणून धोनीने चालू सामन्यात विराटला बनवले यष्टीरक्षक; विराटचा खुलासा…
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल इतिहासातील ५ सर्वोच्च वैयक्तिक खेळी; २ खेळाडूंनी तर दोनदा केलाय हा पराक्रम
एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’….
आरसीबीने आयपीएलमध्ये केल्यात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा; पहा बाकी संघ आहेत कोणत्या क्रमांकावर