मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने कौटुंबिक कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागी आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झम्पाची संघात निवड केली आहे. इंग्लंडविरूद्धची टी20 आणि वनडे मालिका संपल्यानंतर तो आरसीबीच्या संघात सामील होईल.
यापूर्वी झम्पाने 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून आयपीएल खेळला होता. आयपीएल 2020 च्या हंगामात त्याला कोणताही खरेदीदार मिळाला नव्हता. परंतु आता आरसीबीने त्याला आपल्या संघात सामील केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झम्पाने अनेकदा विराट कोहलीला बाद केले होते. आता तोच झम्पा विराटच्या नेतृत्वात आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा हा युवा फिरकीपटू या वर्षी त्याची मैत्रीण हॅती ले पामर हिच्याशी लग्न करणार होता. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन असल्यामुळे त्याचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. 2017 मध्ये झम्पा आणि त्याची मैत्रीण चर्चेत आले होते.
खरं तर, त्या काळात भारतात असल्याने त्याने काही हिंदी शब्दही शिकले. काही खेळाडूंनी त्याच्याशी विनोद करताना त्याला हिंदीमध्ये शिवी देखील शिकवली. ज्याचा अर्थ कदाचित त्याला माहीत देखील नव्हता.
Cricketer Adam Zampa and his Girlfriend. 😂
Relationship Goals. 💯 pic.twitter.com/3Z9G046LJZ— Man after my own heart. (@DayaDhavale) May 1, 2017
यानंतर, त्याच्या मैत्रिणीने एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, ‘मला आठवण करून दिल्याबद्दल भारताचे आभार.’ यावर कमेंट्स करताना झम्पाने हिंदीमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यानंतर या जोडप्याची खिल्ली उडवली गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय: ‘या’ दिग्गजाची प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती
-माझा रैनावर काहीही अधिकार नाही, त्याच्या कमबॅकचा निर्णय घेणार हा व्यक्ती
ट्रेंडिंग लेख-
-दिग्गजाने निवडले ५ भारतीय खेळाडू, जे घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा
-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप
-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट