-आबासाहेब पवार
क्रिकेटचा इतिहास पाहिला तर आपल्या असे लक्षात येते, की भारतीय क्रिकेटचा इतिहास हा पूर्वीपासूनच तेजस्वी राहिला आहे. कपिल देव यांच्यापासून ते विराट कोहलीपर्यंत सर्वांनीच जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे नाव चमकावले आहे. भारतीय क्रिकेट संघाने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर प्रचंड विक्रम तोडलेही आहेत आणि असे काही नवीन विक्रम बनविले आहेत, जे सहजा- सहजी तोडणे शक्य नाही. एवढे असले तरीही भारतीय क्रिकेट संघाचे काही पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे खूप वेळा नुकसानही झाले आहे. शेवटी असेच म्हटले जाते, की तो खेळाचाच एक भाग असतो.
आज आपण या लेखात अशाच ३ पंचांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी भारतीय क्रिकेट टीमच्या विरोधात खूप वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. ज्या निर्णयांमुळे सचिन तेंडुलकरांसारख्या महान खेळाडूचे शतकही खूप वेळा हुकले आहेत.
१. स्टीव बकनर
स्टीव बकनरांचे (Steve Bucknor) नाव ऐकताच खूप भारतीय क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावर राग येतो. त्याचे कारणही तसेच आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी यांचे नाव कधीच विसरू शकत नाहीत. २००८ मधे सिडनी येथे झालेल्या एका कसोटी सामन्यात बनकर यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या विरोधात १, २ नाही, तर तब्बल ६ चुकीचे निर्णय दिले होते. यांच्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट संघाला जिंकूनही पराभवाचे तोंड पहावे लागले होते. सचिन तेंडुलकरचाही (Sachin Tendulkar) त्यांच्याबरोबर ३६ चा आकडा राहायचा.
सचिन हा एकमेव खेळाडू आहे, जो बनकर यांच्या खराब पंचगिरीचा सर्वात जास्त वेळा शिकार बनला आहे. त्यांच्या खराब पंचगिरीमुळेच सचिन ३- ४ वेळा शतक बनवू शकला नाहीत. तसेच, आपल्याला तर माहितच आहे की शतकांचे महाशतक करत असताना शेवटचे काही शतक बनविण्यात त्याचा खूप जास्त वेळ गेला होता.
सन २००३- २००४ मधील गोष्ट आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पहिल्या कसोटी सामन्यात गिलेस्पी गोलंदाजी करत होता, तेव्हा पंच बनकर यांनी सचिनला शून्य धावेवर पायचीत बाद घोषित केले होते. जेव्हा रिप्ले घेतला गेला, तेव्हा ही गोष्ट सरळ- सरळ दिसत होती की चेंडू यष्टींच्या बाहेरून जात होता.
२. अशोक डी सिल्वा
श्रीलंका आणि भारतीय संघातील सामन्यात जर पंच म्हणून अशोक डी सिल्वा असायचे, तर त्यांचा कमीत कमी एक निर्णय तरी भारतीय संघाविरुद्ध असण्याची शक्यता असायची.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीलाही (Sourav Ganguly) डी सिल्वाच्या खराब पंचगिरीचे शिकार व्हावे लागले आहे. २००२ मध्ये विंडीजविरुद्धच्या कसोटीतील पहिल्या डावात डी सिल्वा यांनी गांगुलीविरुद्ध चुकीचा निर्णय दिला होता. यादरम्यान डी सिल्वा यांना बऱ्याच टीकांचा सामना करावा लागला होता. त्यांनी सचिनविरुद्धही अनेक वादग्रस्त निर्णय दिले आहेत.
तरीही, सध्याच्या काळात भारतीय खेळाडूंसाठी एक गोष्ट चांगली आहे, की आता डी सिल्वा आता पंचगिरी करत नाहीत. त्यामुळे सध्याचे भारतीय खेळाडू त्यांच्या खराब निर्णयांचा शिकार होत नाहीत.
३. कुमार धर्मसेना
श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू कुमार धर्मसेना यांच्या पंचगिरीचा उल्लेख भारतीय संघाचा माजी दिग्गज सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) समालोचनादरम्यान केला आहे. त्याने अनेकवेळा समालोचनादरम्यान स्पष्टपणे म्हटले आहे, “धर्मसेना यांनी त्याला अनेक वेळा चूकीचा निर्णय देऊन बाद केले आहे.”
ते २०१९च्या विश्वचषकादरम्यान देखील अनेक वेळा आपल्या खराब पंचगिरीमुळे चर्चेत आले होते. त्यांनी घेतलेले निर्णय वादग्रस्त होते. त्याचबरोबर त्यांच्या खराब पंचगिरीमुळे न्यूझीलंडला २०१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकाविता आले नाही. खरंतर, त्यांनी ओव्हर थ्रो चे इंग्लंडला ६ धावा दिल्या होत्या, ज्या आयसीसीच्या नियमानुसार केवळ ५ धावा होत्या.
भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांना धर्मसेना अजिबात आवडत नाहीत. कारण, अनेक वेळा त्यांनी भारतीय संघाच्या विरोधात वादग्रस्त निर्णय दिले आहेत.
अशा प्रकारे कित्येक वेळा कसलीही चूक नसताना केवळ अशा काही पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट संघाला खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे, जे कोणताही भारतीय क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाही.
ट्रेंडिंग लेख-
-असा बनला कचरा वेचणारा मुलगा जगातील सर्वात खतरनाक फलंदाज, आज ओळखला जातो षटकार किंग
-३ षटकांत शतक ठोकणारा जगातील एकमेव फलंदाज, मारले होते तब्बल २९ चौकार
-या ५ भारतीय क्रिकेटर्सचे हमशकल पाहिलेत का? पाहून तुम्हीही व्हाल दंग