भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमधील प्रदर्शन शानदार आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय संघाच्या कसोटी प्रदर्शानाचा स्तर वाढत चालला आहे. तब्बल ४२ महिने आयसीसी कसोटी क्रमवारीत भारत अव्वल क्रमांकावर विराजमान होता. परंतु, आता त्यांच्या स्थानामध्ये बदल झाला आहे. तरीही भारताने तिसरे स्थान कायम आहे. याचे सर्व श्रेय जाते, भारतीय कसोटी संघातील दमदार गोलंदाजांना आणि संघातील दमदार फलंदाजांना.
तसं पाहिल तर, सध्या भारतीय कसोटी संघातील प्रत्येक फलंदाज उत्कृष्ट आहे. मात्र, त्यापैकी विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांना संघातील सर्वात खतरनाक फलंदाज समजले जाते. तर, रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल हे सलामीवीर फलंदाजही कोणापेक्षा कमी नाहीत. पण, असेही काही भारतीय फलंदाज आहेत, जे बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर आहेत. तरीही अद्याप त्यांनी निवृत्ती घेतलेली नाही.
या लेखात अशाच काही भारतीय फलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन होणे कठीण आहे. म्हणून त्यांनी कसोटीतून निवृत्ती घेणे हे त्यांच्यासाठी अधिक सोईचे ठरेल.
या ५ भारतीय फलंदाजांनी घ्यायला पाहिजे कसोटीतून निवृत्ती
5 Indian Cricketers Should Announce Retirement From Test Cricket
१. सुरेश रैना :
एकेवेळेला सुरेश रैना हा भारतीय कसोटी संघाचा मधल्या फळीतील दमदार फलंदाज होता. परंतु, २०१५मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यापासून त्याला संघातून काढून टाकण्यात आले. सध्याच्या भारतीय कसोटी संघात मधल्या फळीत विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांसारखे विस्फोटक फलंदाज उपस्थित आहेत. त्यामुळे रैनाच्या पुनरागमनाची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे त्याने कसोटीतून निवृत्ती घ्यायला पाहिजे.
रैनाने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १८ सामन्यात २६.४८ च्या सरासरीने ७६८ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ७ अर्धशतकी खेळींचा समावेश आहे. शिवाय रैनाने २०१०मध्ये श्रीलंकाविरुद्ध कसोटी पदार्पण करत शतकी सुरुवात केली होती. यावेळी त्याने १२ चौकार आणि २ षटकारांसह १२० धावा केल्या होत्या. हे त्याचे कसोटीतील एकमेव शतक ठरले.
२. पार्थिव पटेल :
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल हादेखील एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा दमदार खेळाडू होता. मात्र, २०१८मधील दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पार्थिव हा सध्या ३४ वर्षांचा झाला आहे. तर, भारतीय कसोटी संघात रिद्धिमान साहा, रिषभ पंत असे चांगले यष्टीरक्षक फलंदाज आहेत. त्यामुळे पार्थिवला कसोटी संघात स्थान मिळणे अशक्य आहे. म्हणून त्याने कसोटीतून निवृत्ती घेण्यातच शहाणपणा ठरेल.
डावखुऱ्या पार्थिवने आतापर्यंत कसोटीत २५ सामन्यात ३१.३३च्या सरासरीने ९३४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे. पण, हा फलंदाज कसोटीत एकही शतक मात्र करु शकला नाही.
३. शिखर धवन :
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील प्रदर्शन उत्तम आहे. वनडे आणि टी२०मध्ये रोहित-धवन ही कर्णधार विराट कोहलीची आवडती सलामी जोडी आहे. परंतु, धवनची कसोटी कारकिर्द संपल्यासारखीच आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने २०१८मधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. तेव्हापासून त्याने पुन्हा भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे धवनने कसोटीतून निवृत्ती घेणे योग्य ठरेल.
धवन कसोटीतील दमदार फलंदाज होता. त्याने त्याच्या ३४ सामन्यांच्या कारकिर्दीत ६६.९५च्या सरासरीने २३१५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या उल्लेखनीय ७ शतकांचा आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
४. दिनेश कार्तिक :
भारताचा सिनीयर यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा २०१८मधील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्यानंतर तो देशांत्रगत क्रिकेटमधील तमिळनाडू संघाचा उत्कृष्ट कर्णधार म्हणून कामगिरी करत आहे, पण त्याला भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची संधी अद्यापही मिळाली नाही. शिवाय भारतीय संघात चांगले यष्टीरक्षक फलंदाजही आहेत. जर, कार्तिकने कसोटीतून निवृत्ती घेतली तर त्याला वनडे किंवा टी२० संघात सामाविष्ट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्तिकने कसोटीतून निवृत्ती घेणे अधिक योग्य ठरेल.
कार्तिकने त्याच्या कसोटी कारकिर्दीत २६ सामन्यात दमदार खेळी केली आहे. त्याने १ शतक आणि ७ अर्धशतकांसह एकूण १०२५ धावा केल्या आहेत.
५. करुण नायर :
भारताचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने कसोटीत २ त्रिशतके केली आहेत. त्याच्यानंतर करुण नायर हा एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याने कसोटीत त्रिशतक ठोकले आहे. २०१६मध्ये इंग्लडविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण करणाऱ्या नायरने फ्कत ४ महिन्यात ६ कसोटी सामने खेळले आणि ३७४ धावा केल्या. परंतु त्याला भारताकडून जास्त कसोेटी सामने खेळण्याची संधी मिळाली नाही.
२०१७मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर त्याला भारतीय संघातून बाहेर काढून टाकण्यात आले. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता खूप कमी आहे. म्हणून नायरने कसोटीतून निवृत्ती घ्यायला पाहिजे.
ट्रेंडिंग लेख-
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार
कपिल देव, सुनिल गावसकरपासून ते गौतम गंभीरपर्यंत, जाणून घ्या कशी घेतली या भारतीय…
मैदानाबाहेर दिग्गज क्रिकेटपटूंकडून घडलेले ५ लाजिरवाणे प्रसंग; जाणून तुम्हालाही…