असे म्हणतात की, आपल्याकडे क्षमता असेल तर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. भारतात असे बरेच क्रिकेटपटू आहेत जे अत्यंत हुशार होते आणि त्यांनी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे टीम इंडिया (भारतीय क्रिकेट टीम) मध्येही स्थान मिळवले होते. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करुनही ते रातोरात भारतीय संघाममधून गायब झाले. आज आम्ही तुम्हाला अशा पाच क्रिकेटपटूंबद्दल सांगू जे गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सक्षम होते. परंतु तरीही भारतीय क्रिकेट संघात त्यांचे स्थान टिकवता आले नाही.
विजय भारद्वाज-
1999 सालचा एलजी कप, कोणताही भारतीय क्रिकेट फॅन्स विसरणार नाही. नैरोबी येथे भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेत भारताच्या विजय भारद्वाज नावाच्या अष्टपैलू खेळाडूने पदार्पण केले. या अष्टपैलू खेळाडूने मालिकेत एकूण 10 गडी बाद केले आणि 89 धावाही केल्या. त्यानंतर त्याला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला. पण लवकरच या अष्टपैलूची कारकीर्द संपुष्टात आली. हा खेळाडू भारतासाठी फक्त 3 कसोटी, 10 वनडे सामने खेळू शकला.
टीनू योहानन
टीनू योहानन भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवणारा हा केरळचा पहिला खेळाडू होता. 2001 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करणा योहाननने चांगलीच गोलंदाजी केली. परंतु तो भारतासाठी फक्त 3 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळू शकला. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अवघ्या एका वर्षाच्या आत संपली.
देबाशिष मोहंती
उडीसाचा स्विंग गोलंदाज देबाशिष मोहंती देखील अशा भारतीय गोलंदाजांपैकी एक आहे जो अत्यंत हुशार असूनही जास्त काळ संघातमध्ये स्थान टिकवता आले नाही. मोहंतीने 1997 मध्ये वनडे आणि कसोटी सामन्यात पदार्पण केले होते, परंतु त्याची कसोटी कारकीर्द केवळ 2 कसोटी सामन्यांपुरती मर्यादित राहिली आणि वनडे कारकिर्दीचे अवघ्या 4 वर्षातच ते संपले. भारताकडून मोहंतीने 45 सामन्यांत 57 बळी घेतले.
अमेय खुरेसिया
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21 शतके ठोकणार्या मध्य प्रदेशचा फलंदाज अमेय खुरेसियाला 1999 मध्ये भारतीय संघामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. पण त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 2001 मध्ये अवघ्या 2 वर्षानंतर संपली. खुरेसिया याला भारताकडून 12 वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली.
अविष्कार साळवी
मुंबईचा वेगवान गोलंदाज अविष्कार साळवी, ज्याला भारताचा ग्लेन मॅकग्राथ म्हटले जात होते, त्याची कारकीर्दही 4 वनडे सामन्यांसाठी मर्यादित होती. 11 एप्रिल 2003 रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू झालेली साळवीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 18 नोव्हेंबर 2003 रोजी संपली. त्यानंतर साळवीने पुढची 10 वर्षे स्थानिक क्रिकेट खेळला पण भारतीय संघात त्याला कधीही संधी मिळाली नाही.