लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात आजपासून (7 सप्टेंबर) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. यात 24 वर्षीय हनुमा विहारीला पहिल्यांदाच 11 जणांच्या भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. त्याला ही संधी अष्टपैलू हार्दिक पंड्या ऐवजी देण्यात आली आहे.
हा सामना विहारीचा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा 360वा खेळाडू तर कसोटीत पदार्पण करणारा 292 वा खेळाडू ठरला आहे.
याबरोबरच या मालिकेत चांगली कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज आर अश्विनलाही या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असून त्याच्या ऐवजी रविंद्र जडेजाचा 11 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत 1-3 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात पराभव स्विकारला तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत चांगले पुनरागमन केले होते. परंतू पुन्हा एकदा चौथ्या सामन्यात विजयाच्या जवळ येऊनही भारताला पराभव स्विकारावा लागला होता.
असा आहे 11 जणांचा भारतीय संघ- विराट कोहली(कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, हनुमा विहारी, रविंद्र जडेजा,जसप्रित बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.
Here's our Playing XI for the game.#ENGvIND pic.twitter.com/AmDSpS2Tyw
— BCCI (@BCCI) September 7, 2018
असा आहे 11 जणांचा इंग्लंड संघ- जो रूट (कर्णधार), मोइन अली, जेम्स अॅंडरसन, जॉनी बेअरस्ट्रो, स्टुअर्ट ब्रॉड, जॉस बटलर, अँलिस्टर कुक, सॅम करन, केटॉन जेनिंग्स, बेन स्टोक्स, आदिल राशिद.
ENG XI: A Cook, K Jennings, M Ali, J Root, J Bairstow, B Stokes, J Buttler, S Curran, A Rashid, S Broad, J Anderson
— BCCI (@BCCI) September 7, 2018