श्रीलंका संघाला नुकत्याच पार पाडलेल्या भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. वनडे मालिकेतील एकही सामना श्रीलंकन संघ जिंकू शकला नाही. तिरुअंनंतपुरममध्ये वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला, जो भारताने 317 धावांच्या विक्रमी अंतराने नावावर केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाचा कर्णधार दासून शनाका आणि मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड यांना जाब चिचारत असल्याचे बोलले जात आहे.
भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंका संघ अवघ्या 73 धावा करून सर्वबाद झाला. तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पाच वाद 390 धावा कुटल्या होत्या. विराट कोहली आणि शुबमन गिल भारतासाठी मॅच विनर ठरले. या दोघांनीही शतक ठोकत विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. त्याचसोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. सिराजने भारतीय संघासाठी सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या, ज्यामुळे श्रीलंकन संघ स्वस्तात सर्वबाद झाला. तिसऱ्या सामन्यातील श्रीलंकन संघाचे सुमार प्रदर्शन त्यांच्या क्रिकेट बोर्डाला चांगलेच खटकल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी त्यांचा कर्णदार दासुन शनाका आणि प्रशिक्षक क्रिस सिल्वरवुड () यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दासुन शनाका आणि क्रिस सिल्वरवुड यांना पराभवानंतर प्रश्न विचारले आहेत. तसेच निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला या मोठ्या पराभवाचे कारण स्पष्ट करायला सांगितले गेले आहे. यासाठी त्यांना सविस्तर अहवाल तयार करावा लागणार आहे. उभय संघांतील या वनडे मालिकेचा विचार केला, तर दासुन शनाका सोडून श्रीलंकेचा एकही फलंदाज 100 पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. शनाकाने या मालिकेत एका शतकाच्या मदतीने 121 धावा केल्या. तसेच पथुन निसंका फक्त एक सामना खेळू शकला आणि यातने 72 धावांची खेळी केली. गोलंदाजी विभागात श्रीलंकेसाठी दिमुथ रजिता सर्वात जास्त 6 धावा घेऊ शकला. पण त्याने 7 पेक्षा इकोनॉमी रेटने धावा खर्च केल्या.
दुसरीकडे विराट कोहलीने भारतासाठी या तीन वनडे समान्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकली. या मालिकेआधी खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात देखील श्रीलंका संघ अपेक्षित कामगिरी करू शकला नव्हता. मात्र, त्याआधी खेळलेल्या आशिया चषकाचे विजेतेपद श्रीलंकाने जिंकले होते. (The Sri Lanka Cricket Board asked captain Dasun Shanaka and coach Chris Silverwood the reason for the defeat)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सेव्हन अ साईड फुटबॉल | निरागस नाईटस, नक्षत्र चिता अव्वल स्थानावर
महिलांच्या 19 वर्षांखालील टी20 विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा विजय; शेफाली बनली ‘प्लेअर ऑफ द मॅच’