पुणे। डेक्कन जिमखाना क्लब यांच्या वतीने नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) प्रायोजित आयटीएफ, एआयटीए व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 20व्या एनइसीसी डेक्कन आयटीएफ 25000डॉलर महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत आरती मुनियन, निधी चिलूमुला, श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती, श्रेया तातावर्ती, सात्विका समा या पाच भारतीय खेळाडूंनी मुख्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत तेराव्या मानांकित श्रेया तातावर्ती हिने आठव्या मानांकित डेन्मार्कच्या एलेना जमशीदीचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून मुख्य फेरी गाठली. चुरशीच्या लढतीत आरती मुनियन हिने शर्मदा बाळूचा 1-6, 6-4[10-1] असा संघर्षापुर्ण पराभव करून आगेकूच केली. अकराव्या मानांकित निधी चिलुमुला हिने दुसऱ्या मानांकित जेनिफर लुइखमचा 4-6, 6-4[10-6] असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. सातव्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती हिने बाराव्या मानांकित हुमेरा बहार्मसचा 6-1, 6-4 असा पराभव केला. चौथ्या मानांकित सात्विका समाने चौदाव्या मानांकित सौम्या विगचे आव्हान 6-0, 6-1 असे संपुष्ठात आणले.
सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: महिला: एकेरी:
वेरोनिका बसझाक (पोलंड) [6] वि.वि.सोहा सादिक (भारत) [9]6-4, 6-4;
क्लारा व्लासेलर (बेलजीअम) [1] वि.वि.रम्या नटराजन (भारत) [10]6-1, 6-2;
आरती मुनियन (भारत) [16]वि.वि.शर्मदा बाळू (भारत)1-6, 6-4[10-1];
निधी चिलुमुला (भारत) [11]वि.वि.जेनिफर लुइखम (भारत) [2]4-6, 6-4 [10-6];
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत) [7] वि.वि.हुमेरा बहार्मस (भारत) [12]6-1, 6-4;
श्रेया तातावर्ती (भारत) [13]वि.वि.एलेना जमशीदी (डेनमार्क)[8]6-1, 6-2;
सो-रा ली (कोरीया) [3] वि.वि.ईश्वरी मातेरे (भारत)6-1, 6-2;
सात्विका समा (भारत) [4] वि.वि.सौम्या विग (भारत) [14]6-0, 6-1.