इंग्लंड संघाचे मागच्या २-३ वर्षांमध्ये प्रदर्शन खराब राहिले होते. त्यांनी अनेक खेळाडूंना इंग्लंडसाठी खेळण्याची संधी दिली होती. परंतु अनेक सामन्यांत विजय न मिळाल्यामुळे इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले जात होते. मात्र मागील चार सामन्यात आक्रमकपणे खेळत त्यांनी चारही सामने जिंकले आहेत. यावर बोलताना या विजयांचा खरा शिल्पकार असलेल्या जॉनी बेयरस्टोने त्याचे गुपित उलगडले आहे.
बेयरस्टो म्हणाला, “खरंतर हे सर्व परिणाम स्वातंत्र्याचे आहेत. आम्ही कोणत्याही कैदेत नाही. आम्ही रोज कोविड चाचणी करुन साधारण जीवन जगू शकतो. जसे की मित्रांसोबत फिरणे, घरच्यांबरोबर वेळ घालवणे आणि बीयरच्या दुकानात जाऊन ती विकत घेत पिणे. त्यामुळे आम्हाला स्वत:ला मैदानावर व्यक्त होण्यास मदत झाली आहे. मात्र या यशाचे तेवढेच श्रेय नवीन कसोटी प्रशिक्षक ब्रॅंडन मॅकल्लम यांनाही जाते.”
(ही बातमी ६० शब्दांत आहे. स्पोर्ट्स विषयावरील हटके बातम्या वाचण्यासाठी भेट द्या- mahasports.in)