ऍशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत सलामीवीर उस्मान ख्वाजा याच्या शानदार शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडविरुद्धच्या दमदार पुनरागमन केले. ख्वाजाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 126 धावा चोपल्या आणि पव्हेलियनमध्ये परतला. दिवसाचा खेळ संपल्यानंतर उस्मान ख्वाजा मुलीसोबत पत्रकार परिषदेत पोहोचला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक चाहते आणि युजर्स हा क्रिकेटमधील सर्वोत्तम फोटो असल्याचे म्हणत आहेत.
उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) तीन वर्षांची लेक आयशा (Aisha) हिच्यासोबत पत्रकार परिषदेत पोहोचला. यावेळी तो पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत होता. तसेच, आपल्या लेकीवर प्रेमाचा वर्षावही करत होता. यावेळी पत्रकारांमध्येही हशा पिकल्याचे व्हिडिओत ऐकू येते. या व्हिडिओलो सोशल मीडियावर चांगली पसंती मिळत आहे.
यादरम्यान ख्वाजा म्हणाला की, “तिला माझ्यापासून दूर राहायचे नाहीये.” आयशा यादरम्यान आपली लहान बहीण आयला हिच्याविषयी विचारताना दिसली. ती म्हणाली की, “आयला कुठे आहे…?” यावर ख्वाजा म्हणतो की, “ती इथे नाहीये, बेबी आयला इथे नाहीये, ती आईसोबत आहे. आपण लवकरच जाऊया, ठीक आहे?”
Cutest moment from Ashes – Khawaja and his daughter in the press conference. pic.twitter.com/WOL3fTvTXd
— Johns. (@CricCrazyJohns) June 18, 2023
उस्मान ख्वाजा हा त्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे, जो नेहमी आपल्या कुटुंबासोबत प्रवास करतो. ख्वाजा यापूर्वी अनेकदा त्याच्या कुटुंबासोबत दिसला आहे. तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत सामन्यानंतर मैदानावर हजर असतो. ख्वाजाची लहान मुलगी आयला हिचा जन्म मे 2022मध्ये झाला होता.
♥️Cutest moment
— Sohel. (@SohelVkf) June 18, 2023
Cutest Video on the Internet. Wow ????????Uzzie
— Naman Sharma (@namansharma1818) June 18, 2023
ख्वाजाचे विक्रमी शतक
उस्मान ख्वाजा याने कसोटी क्रिकेटमधील 15वे शतक झळकावले. यासोबतच त्याने बर्मिंघमच्या एजबॅस्टन मैदानात सलामीवीर म्हणून 26 वर्षांनंतर शतक ठोकण्याचा कारनामा केला आहे. शेवटचे 1997मध्ये ऍशेस मालिकेतच ऑस्ट्रेलियन माजी खेळाडू मार्क टेलर याने या मैदानावर 129 धावांची शतकी खेळी केली होती.
तसेच, ख्वाजाने 2022पासून आतापर्यंत एकूण 7 कसोटी शतके ठोकली आहेत. याबाबतीत त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट (Joe Root) याची बरोबरी केली आहे. या बाबतीत जॉनी बेअरस्टो हा 6 शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे.
इंग्लंडपासून 82 धावांनी मागे
ऍशेस मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंड संघाने आपला पहिला डाव 8 बाद 393 धावांवर घोषित केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानेही दमदार पुनरागमन करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावत 311 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलिया इंग्लंडपासून 82 धावांनी मागे आहे. तसेच, उस्मान ख्वाजा 126, तर ऍलेक्स कॅरे नाबाद 52 धावांवर नाबाद आहेत. (cricketer usman khawaja reached the press conference with his daughter ashes 2023 eng vs aus see video)
महत्वाच्या बातम्या-
‘…माझी शेवटची मालिका ठरू शकते’, अश्विनने पत्नीला सांगितलेल्या मनातल्या वेदना; स्पिनरचा मोठा खुलासा
अर्रर्र…इतकी खराब फिल्डिंग! धावत राहिले फलंदाज, जवळूनही बाद करू शकले नाहीत फिल्डर, पाहा व्हिडिओ