राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएलच्या तेराव्या हंगामीतल २६वा सामना झाला. रविवारी (११ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात हैदराबादच्या मनीष पांडेने मोठा विक्रम केला.
हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी निवडली. त्यामुळे वॉर्नर आणि यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. मात्र पहिल्या ५ षटकांच्या आतच बेयरस्टो झेलबाद होत पव्हेलियनला परतला. त्यानंतर मनिष पांडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला.
या सामन्यात पांडेने ४४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. यासह तो टी२० क्रिकेटच्या इतिहासात ५५०० धावांचा आकडा पार करणारा नववा भारतीय फलंदाज ठरला आहे.
पांडेपुर्वी विराट कोहली (९१२३ धावा), रोहित शर्मा (८८५३ धावा), सुरेश रैना (८३९२), शिखर धवन (७४२६ धावा), एमएस धोनी (६७३३ धावा), रॉबिन उथप्पा (६५३७ धावा), गौतम गंभीर (६४०२ धावा) आणि दिनेश कार्तिक (५८१५ धावा) यांनी टी२० क्रिकेटमध्ये ५५०० धावांचा आकडा पूर्ण केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ
पराभवानंतरही धोनीचे खास ‘त्रिशतक’ पूर्ण; पाहा काय केलाय कारनामा
आंतरराष्ट्रीय कर्णधार म्हणून तू दिनेश कार्तिकला स्वेच्छेने सूचना देतो का? मॉर्गनने दिले ‘हे’ उत्तर
ट्रेंडिंग लेख-
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ