आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला 5 ऑक्टोबर रोजी भारतात सुरूवात झाली आणि या विश्वचषकात सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अनेक जबरदस्त विक्रम नोंदवले गेले. आतापर्यंत, आतापर्यंत विश्वचषकात अनेक मोठे विक्रम बनवलेले पाहिले आहेत ज्यात वनडे विश्वचषकातील सर्वात मोठी सांघिक धावसंख्या, सर्वात मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग, सर्वात वेगवान शतक आणि सर्वाधिक शतके यांचा समावेश आहे. या काळात फलंदाजांचे वर्चस्व होते आणि गोलंदाजांनाही खूप मेहनत घ्यावी लागली आहे. 2023 विश्वचषकातही अनेक जबरदस्त शतके पाहायला मिळाली आहेत आणि आतापर्यंत अनेक फलंदाजांनी तीन आकडी धावसंख्या केली आहे.
विश्वचषकात आतापर्यंत 24 सामने खेळले गेले आहेत आणि फलंदाजांकडून 20 शतके पाहायला मिळाली आहेत. 5 ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या चालू हंगामाच्या पहिल्या सामन्यात दोन शतके पाहायला मिळाली. त्यानंतरही शतकांचा ट्रेंड कायम राहिला. त्याच वेळी, 10 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामन्यात चार शतके झळकावली गेली, जी वनडे विश्वचषकातील कोणत्याही एका सामन्यात सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे.
भारतात सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील पहिले शतक न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेने झळकावलेले. त्याच्या विश्वचषक पदार्पणाच्या सामन्यातच त्याने इंग्लंडविरुद्ध स्फोटक खेळी खेळली आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. यानंतर आपण अनेक चांंगली शतके पाहिली आहेत.
येत्या सामन्यांमध्ये आपल्याला आणखी अनेक शतकी खेळी पाहायला मिळू शकतात. पण त्याअगोदर आतापर्यंत झालेल्या विश्वचषकातील सामन्यांत शतक झळकवलेल्या खेळाडूंची यादी पाहू.
विश्वचषक 2023 मध्ये शतक करणारे खेळाडू :
152- डेवॉन कॉनवे, विरुद्ध- इंग्लंड
123 – रचिन रविंद्र, विरुद्ध- इंग्लंड
100 – क्विंटन डी काॅक, विरुद्ध – श्रीलंका
108 – रासी वॅन डर डुसेन, विरुद्ध – श्रीलंका
106 – एडन मार्करम, विरुद्ध – श्रीलंका
140 – डेविड मलान, विरुद्ध – बांगलादेश
122 – कुसल मेंडिस, विरुद्ध – पाकिस्तान
108 – सदीरा समरविक्रमा, – विरुद्ध – पाकिस्तान
113 अब्दुल्ला शफिक, विरुद्ध – श्रीलंका
131 – मोहम्मद रिझवान, विरुद्ध – श्रीलंका
131 – रोहित शर्मा, विरुद्ध – अफगानिस्तान
109 – क्विंटन डी काॅक, विरुद्ध – ऑस्ट्रेलिया
103 – विराट कोहली, विरुद्ध – बांगलादेश
163 – डेविड वाॅर्नर, विरुद्ध – पाकिस्तान
121 – मिचेल मार्श, विरुद्ध – पाकिस्तान
109 – हेन्रिक क्लासेन, विरुद्ध – इंग्लंड
130 – डॅरेल मिचेल, विरुद्ध – भारत
174 – क्विंटन डि काॅक, विरुद्ध – बांगलादेश
104 – डेव्हिड वॉर्नर, विरूद्ध – नेदरलँड्स
106 – ग्लेन मॅक्सवेल, विरूद्ध – नेदरलँड्स
महत्वाच्या बातम्या –
अफगाणिस्तानच्या विजयावर धमाकेदार डान्स करणाऱ्या इरफानला मिळाली खास भेट, इंस्टावरून दिली माहिती
‘हा कुठला नंबर 1, ज्याला सरळ सिक्स…’, बाबरच्या फलंदाजीवर माजी दिग्गजाची तिखट प्रतिक्रिया