भारत आणि श्रीलंका संघात काल म्हणजे 18 जुलैला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघाला 7 विकेट्सने पराभूत केले. त्याचबरोबर भारतीय संघाकडून ईशान किशन, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यामध्ये कर्णधार शिखर धवनने नाबाद 86 धावा केल्या. तर ईशान किशनने आपल्या पदार्पणाच्या वनडे सामन्यात 42 चेंडूंमध्ये 59 धावा केल्या. याच्या व्यतिरिक्त पृथ्वी शॉने देखील आक्रमक फलंदाजी करत 24 चेंडूमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या.
पृथ्वी शॉने केलेल्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पृथ्वीच्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. इतकेच नव्हे तर त्याची प्रेयसी आणि भारतीय अभिनेत्री प्राची सिंगचेही मन जिंकले आहे. खरे तर प्राचीने पृथ्वी शॉचा एक फोटो तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केले आहे आणि कॅप्शनमध्ये हार्टचा इमोजी देखील शेअर केली आहे. त्याचबरोबर कॅप्शन लिहिले की, ‘पृथ्वी शो टॉपर शॉ’.
याबरोबरच त्याचा समानावीर पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलतानाचा फोटोही स्टोरीमध्ये पोस्ट करत कौतुक केले आहे.
ईशान किशनचे अविस्मरणीय वनडे पदार्पण
या सामन्यात पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर ईशान किशन फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. ईशानने आपल्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यातील पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. याबरोबरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत अर्धशतकही झळकावले. यासह त्याने बरेचसे विक्रमही नावावर केले आहेत.
श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी पदार्पण केले. 18 जुलै रोजी ईशानचा वाढदिवसही होता. आपल्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ईशान हा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच वनडेत श्रीलंकेची हारकिरी, नवनियुक्त कर्णधाराने सांगितलं कुठे झाली चूक?
धवन ब्रिगेडचा पहिल्याच वनडेत श्रीलंकेला धोबीपछाड, कर्णधाराने ‘या’ खेळाडूंना दिले श्रेय
अय्योव! कोलंबो वनडेदरम्यान अचानक मैदानात आला पतंग, पुढे काय घडले एकदा पाहाच