इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड खर्च कमी करण्यासाठी अनेक पावलं उचण्याच्या तयारीत आहे. कारण कोविड-१९ मुळे त्यांना १८ कोटी २० लाख पाऊंडचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा दावा द गार्डियनच्या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
ईसीबीने बुधवारी (५ ऑगस्ट) १८ प्रथम श्रेणी काऊंटी आणि काऊंटी बोर्डसोबत बैठक घेतली. यामध्ये त्यांनी सांगितले की त्यांना चालू आर्थिक वर्षात कमीत कमी १० कोटी ६० लाख पाऊंडचे नुकसान होण्याची शक्यता आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, “या आकड्यांनुसार असे म्हटले जात आहे की पुरूष आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतर सर्व सत्रांचे आयोजन जैव- सुरक्षित वातावरणात होईल. ज्यामध्ये पाकिस्तान दौरा आणि सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा मर्यादित षटकांच्या ६ सामन्यांच्या क्रिकेट दौऱ्याचा समावेश आहे.”
त्यात म्हटले आहे की, “परंतु असा इशारा देण्यात आला आहे की यापैकी कोणताही सामना रद्द झाल्यास किंवा ईसीबी पुढील वर्षी भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका दौर्याची तिकिटे विकण्यास अपयशी ठरल्यास, तोटा ७ कोटी ६० लाख पाऊंडपर्यंत वाढू शकतो.”
ईसीबी आपल्या कर्मचार्यांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करू शकते, असे सूत्रांनी सांगितले. कोरोना व्हायरस साथीच्या प्रादुर्भावापूर्वी ईसीबीमध्ये ३७९ कर्मचारी होते.
महत्त्वाच्या बातम्या –
-दिग्गज म्हणतोय, या गोलंदाजांमध्ये दिसतोय वकार, वसीमची आक्रमकता
-५ वर्षांपुर्वी बेन स्टोक्सने टाकलेल्या ‘त्या’ एका चेंडूची जगाने घेतली दखल
-४७० मिनीटं पीचवर तळ ठोकून त्याने २४ वर्ष जुना विक्रम मोडला
ट्रेंडिंग लेख –
-या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत
-या ५ घटनांवेळी भारतीय क्रिकेटपटू आपले अश्रू रोखू शकले नाहीत
-क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक चर्चा होणारी कसोटी मालिका अर्थातच ऍशेज