आशिया चषक 2023 स्पर्धेत श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील निर्णायक सामना मंगळवारी (5 सप्टेंबर) खेळला गेला. उभय संघांतील या सामन्यात श्रीलंकेने 2 धावांनी विजय मिळवला आणि सुपर फोरमध्ये जागा पक्की केली. अफगाणिस्तान संघाला विजयासाठी 292 धावा हव्या होत्या, ज्या त्यांना करता आल्या नाहीत. सोबतच सुपर फोरसाठी पात्र ठरण्यासाठी अफगाणिस्तानला 37.1 षटकात विजय मिळवणे गरजेचे होते. पण आता असे समोर येत आहे की, अफगाणिस्तन संघ व्यवस्थापनाला याबाबत पूर्ण माहिती दिली गेली नव्हती. त्यामुळे आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने तक्रार दाखल केली आहे.
अफगाणिस्तान संघ या सामन्यात 37.4 षटकांमध्ये 289 धावांवर सर्वबाद झाला. राशिद खान शेवटपर्यंत खेळपट्टीवर होता, पण नॉन स्ट्राईकवर असल्यामुळे त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. राशिद स्ट्रेईकवर असता, तर संघ 37.1 षटकात विजय मिळवून सुपर फोरसाठी पात्र ठरू शकत होता. सुपर फोरसाठी आवश्यक असलेला निर्धारित षटकांमधील विजय न मिळाल्यामुळे राशिद खान चांगलाच निराश झाला होता. नॉन स्ट्राइक एंडवर गुडघ्यांवर बललेला राशिद खान सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल झाला. 37व्या षटकातील पहिला चेंडू झाल्यानंतर राशिदने सुपर फोरच्या आशा सोडल्या होत्या. पण प्रत्यक्षात संघाकडे असणाऱ्या संधी संपल्या नव्हता.
सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानला 37.1 षटकात जिंकणे गरजेचे होते. पण ते शक्य न झाल्यास 37.2 षटकात संघ 293 धावा करू शकत होता. सोबतच 37.3 षटकात 294 धावाही करता येऊ शकत होत्या. तसेच 37.5 षटकात 296, तर 38.1 षटकात 297 धावा करून संघ सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्के करू शकत होता. मात्र, याबाबत अफगाणिस्तान संघ व्यवस्थापनाला याबाबत कुठलीच कल्पना नव्हती. ज्यामुळे संघाला सुपर फोरमध्ये जागा मिळाली नाही.
या सर्व शक्यता सामन्यादरम्यान स्क्रीनवर कुठेही दाखवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट कौन्सिलकडे त्या सामन्यात उपलब्ध असलेल्या पंच, सामनाधिकारी व स्कोरर यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
(Afghanistan Cricket Board Lodges Official Complaint Against Officials In Match Against Srilanka)
हेही वाचाच-
बापरे बाप! ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या घरात घुसले 3 अजगर, पठ्ठ्याने अजिबात न घाबरता स्वत: काढलं बाहेर, Video
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी वाढली भारताची ताकद, टीम इंडियात स्टार खेळाडूचे कमबॅक