क्रिकेट हा खेळ बऱ्याच लोकांचा आवडता आणि मनोरंजक खेळ आहे. परंतु हाच खेळ एखाद्याच्या जीवावर देखील उठू शकतो. यापैकी रमन लांबा, वसीम राजा, इयान फोली, अब्दुल अजीज, डेरिन रांडेल, फिलिप वैन हे असे खेळाडू आहेत ज्यांचा मृत्यू क्रिकेटच्याच मैदानात झाला होता. यापैकी आपण एका अशा खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचा आजच्याच दिवशी 136 वर्षांअगोदर जन्म झाला होता आणि त्यांच्या मृत्यूचे कारण देखील क्रिकेट मैदानच ठरले होते. ते खेळाडू आहेत, इंग्लंडचे ‘अँडी ड्यूकेट’.
ड्यूकेट यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द मोठी राहिली नाही, पण क्लब क्रिकेटमध्ये त्याने बरीच मोठी कामगिरी केली होती. ते इंग्लंडचा एक यशस्वी क्रिकेटपटू तर होतेच, परंतु फुटबॉलपटू देखील होता. त्यांनी या दोन्ही खेळांमध्ये आपले नाव कोरले होते.आणि त्या काळातील एक शक्तिशाली फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या नावावर कित्येक विक्रमही नोंदविले होते. त्यांच्या आयुष्यातील एक वेदनादायक भाग देखील होता, ज्याने संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून सोडले होते, ते म्हणजे त्यांचा भयानक मृत्यू.
ड्यूकेट यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1886 रोजी दक्षिण लंडनच्या ब्रिक्सटन येथे झाला होता. त्यांनी 1921 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात एकच आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ज्यात त्यांनी 5 धावा केल्या होत्या. त्यानंतर ते पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसले नाहीत. तथापि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली होती. त्यात त्यांनी 429 प्रथम श्रेणी सामन्यांत 39.31 च्या सरासरीने 23373 धावा केल्या होत्या. यात 52 शतके आणि 109 अर्धशतकांचा समावेश होता. तर त्यांची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 306 इतकी होती.
कसा झाला होता त्यांचा मृत्यू?
सन 1931 मध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पाच वर्षांसाठी ते एटन महाविद्यालयात क्रिकेट प्रशिक्षकपदी रुजू झाले. त्याचप्रमाणे ते स्पोर्ट्स रिपोर्टर देखील होते. एकदा ड्यूकेट लॉर्ड्स क्रिकेट मैदानात सामना खेळत होते. त्यावेळी फलंदाजी करताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी मैदानावर आपले प्राण सोडले. त्यावेळी त्यांचे वय अवघे 56 वर्षे इतके होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाब किंग्जची साथ सोडणाऱ्या जाफरच्या जागी ‘या’ दिग्गजाची वर्णी, असेल संघाचा नवा फलंदाजी प्रशिक्षक
मूर्ती लहान पण कीर्ती महान! आयपीएल २०२२ चे ५ सर्वात युवा धुरंधर, विश्वविजेत्या कर्णधाराचा समावेश