आजपासून (15 सप्टेंबर) 14 व्या एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा 2019 च्या विश्वचषकाच्या दृष्टीने संघबांधणीसाठी फायदेशीर आहे, असे भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे.
तसेच त्याने या स्पर्धेत भारताचे लक्ष फक्त पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावरच नाही तर विजेतेपद जिंकण्यावर आहे, असेही स्पष्ट केले आहे.
ही स्पर्धा सुरु होण्याआधी कर्णधारांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित बोलत होता. तो म्हणाला, “प्रत्येक संघाला विश्वचषकाआधी चांगल्या मनस्थितीत जायचे आहे. पण आम्ही खूप पुढचा विचार करत नाही. नक्कीच एशिया कप प्रत्येक संघाला विश्वचषकाला योग्य संघबांधणी करण्यासाठी संधी देईल.”
“मला माहित नाही की अँजेलो मॅथ्यूज, सर्फराज अहमत, मशरफ मोर्तझा याकडे कसे पाहतात आणि त्यांचे सामर्थ्य आणि कमकुवत बाजू कोणती आहे. पण जशी स्पर्धा पुढे जाईल संघ काय करत आहेत हे आम्हाला समजेल.”
रोहित पुढे म्हणाला, “अजून विश्वचषकाला वेळ आहे. आम्ही त्याआधी खूप सामने खेळणार आहे. अनेक खेळाडूंना विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यासाठी आपले भक्कम पर्याय समोर ठेवण्यासाठी संधी मिळणार आहे. त्यानुसार योग्य संघबांधणी करण्यासाठी हा चांगली संधी आहे.”
याबरोबरच रोहित पाकिस्तानच्या सामन्याबद्दल म्हणाला, “पाकिस्तान चांगले क्रिकेट खेळत आहे. आमचे त्या सामन्याकडे लक्ष आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की आमचे लक्ष फक्त त्या एका सामन्याकडे आहे, आमचे लक्ष आम्ही खेळणार असलेल्या सर्व सामन्यावर आहे. कारण आम्ही सर्व सामने स्पर्धांत्मक असणार आहेत.”
” आमचे लक्ष पूर्ण स्पर्धेवर असणार आहे कारण प्रत्येक संघ विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने खेळणार आहे. त्याचबरोबर मा पहिल्यांदाच एका पूर्ण स्पर्धेसाठी कर्णधार असणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे उत्साह देणारे आहे.”
"We are looking forward to our game against Pakistan, but the focus should not be on just one game. There are other teams in the #AsiaCup who are eying the 🏆 as well," – India captain @ImRo45 pic.twitter.com/rnGbOaAwic
— BCCI (@BCCI) September 15, 2018
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे त्यामुळे भारताचे प्रभारी कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आहे. तसेच उपकर्णधारपदी शिखर धवनची निवड करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील भारताचे साखळी फेरीतील सामने 18 आणि 19 सप्टेंबरला अनुक्रमे हाँग काँग आणि पाकिस्तान विरुद्ध होणार आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–रिषभ पंतने इंग्लंड विरुद्ध शेवटच्या कसोटीत केलेला हा विक्रम राहिला दुर्लक्षित
–ओळख एशिया कप २०१८ मधील ‘अ’ गटाची
–ओळख एशिया कप २०१८ मधील ‘ब’ गटाची
–एशिया कप २०१८: भारतीय संघाच्या मदतीसाठी दुबईला जाणार हे गोलंदाज