ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार टिम पेन याने आपल्या संघाच्या फलंदाजी क्रमाविषयी महत्वाची माहिती दिली आहे. टिम पेन याने अशा चर्चा ऐकल्या आहेत की, ऑस्ट्रेलियन संघ आघामी मालिकेत नव्या सलामीवीर फलंदाजाला संधी देऊ शकते. डेविड वॉर्नर चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.
ऑस्ट्रेलिय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा प्रत्येक संघ सध्या आघामी वनडे विश्वचषकाच्या तयारीत आहे. ऑस्ट्रेलियाला विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि पाच सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. 30 ऑगस्ट रोजी उभय संघांतील टी-20 मालिका सुरू होईल, तर 7 सप्टेंबर रोजी वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाईल. टिम पेन (Tim Paine) याच्या मते ऑस्ट्रेलियन संघ व्यवस्थापन या मालिकेत डेविड वॉर्नर (David Warner) याला चौथ्या क्रमांकावर खेळवू शकते. ट्रेविस हेड (Travis Head) आणि मिचेल मार्श (Mitchell Marsh) यांना सलामीवीर म्हणून संधी मिलण्याची शक्यता पेनने वर्तवली आहे.
यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघ मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर असतानाही वॉर्नर चौथ्या क्रमांकावर खेळला होता. तर ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श यांना डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले होते. वॉर्नरने मागच्या 16 वनडे डावांमध्ये सात अर्धशतक केले आहेत. मात्र, तरीदेखील त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवणे अनेकांसाठी अनोखा निर्णय आहे. पण टिम पेनच्या मते संघाला वेगवान सुरुवात मिळावी, यासाठी संघ व्यवस्थापन सलामीवीर म्हणून हेड आणि मार्शला निवडू शकतात.
टिम पेन याविषयी म्हणाला की, “मी असे ऐकले आहे की, ट्रेविस हेड आणि मिचेल मार्श आपले सर्वात विस्फोटक खेळाडू असून ते सलामीला खेळू शकतात. वॉर्नरला चौथ्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते. वॉर्नर स्पिन चांगली खेळतो आणि खेळपट्टीवर चपळ देखील आहे. त्याच्याकडे ताकद आहे आणि डाव आपल्या मुठीत ठेवू शकतो. त्यामुळे मी देखील त्याला मध्यक्रमात खेळातना पाहू इच्छितो. मी याविषयी काहीजणांकडून ऐकले आहे की, याविषयी चर्चा देखील झाली आहे.”
दरम्यान, मागच्या काही महिन्यांपासून वॉर्नर कसोटी फॉरमॅठमधून निवृत्त होणार अशा चर्चा सुरू आहेत. त्याने स्वतः देखील तसे संकेत दिले आहेत. (Australia team management may send David Warner to bat at number four in the upcoming series)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । श्रीलंकन अष्टपैलूचे हे रुप पहिल्यांदाच दिसले, बहिणीच्या लग्नात हसरंगा भावूक
ट्रेनिंग कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी गुड न्यूज, वाचा काय-काय घडलं