भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतील चौथा व निर्णायक कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. सिडनी येथे झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघावर प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात वर्णभेदात्मक शब्द वापरले होते.या संपूर्ण प्रकरणाबद्दल क्रिकेटविश्वाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनने देखील प्रेक्षकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
पत्रकार परिषदेत पेन म्हणाला ,” माझे मत आहे की सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी कोणत्याही खेळाडू बद्दल अपशब्द वापरणे चुकीचे आहे. प्रेक्षकांनी वर्णभेद टाळून केवळ क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानात यावे.ऑस्ट्रेलियासाठी किंवा भारतासाठी समर्थन करा व जर आवडत असेल तर अंपायरांचेदेखील समर्थन करा. माझे आव्हान असेल की जे प्रेक्षक सामना बघण्यासाठी येतील, त्यांनी गेटच्या बाहेरच बेशिस्तपणा सोडून यावा .”
सिडनी येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज व इतर खेळाडूंबद्दल मोठ्या प्रमाणात वर्णभेद व अपशब्द वापरले गेले होते. अंपयरांनी यानंतर मध्यस्थी करत त्या प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकलून लावले होते. मात्र तरदेखील अशा प्रकरणाबद्दल कठोर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी सर्व क्रिकेट पंडितांकडून केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
अजिंक्य रहाणेने ही कामगिरी केली तर शास्त्री गुरुजी पडणार तोंडघशी, कसं ते पाहाच!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी : उत्तर प्रदेशचा सलग तिसरा पराभव, सुरेश रैना पुन्हा अपयशी